Maan Political News : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात कुळकजाई येथे भाजपच्या विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत कार्यक्रमात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा उपस्थित होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यावर टीका केली. 'त्यांचं नावच मोठं, काम तर मोठं दिसत नाही', असा टोला यावेळी त्यांनी खासदार शरद पवार यांना लगावला.
तर आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी या भागासाठी शरद पवार यांनी काहीच केले नसल्याची खंत व्यक्त केली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, गणेश सत्रे, शिवाजीराव शिंदे, जयकुमार शिंदे, अरुण गोरे, अर्जुन काळे, दादासाहेब काळे, धनाजी जाधव, सिध्दार्थ गुंडगे उपस्थित होते.
यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी शरद पवार यांचा नामोल्लेख करुन या भागातील माणसांनी त्यांना भरभरून प्रेम दिले पण त्यांनी या भागासाठी काहीच केले नसल्याचे सांगितले त्यावरुन अजयकुमार मिश्रा (Ajaykumar Mishra) म्हणाले, 'त्यांचं नावच मोठं, काम तर मोठं दिसत नाही'. खोटं बोलून, धर्म, जातीच्या आधारावर लोकांच्यात संभ्रम निर्माण करुन ते निवडणूका जिंकत होते.
मात्र, परत ते मतदार संघात फिरकत नव्हते. पुन्हा निवडणुकीवेळी गोड बोलून मत मागत होते आणि तुम्ही देत होता. परत परत तेच जिंकत होते, असे मिश्रा यांनी सांगितले. नरेंद्र मोदीं (Narendra Modi) च्या रुपाने एक परिवर्तन आले. तुम्ही सुध्दा तुमच्यातीलच एक नेतृत्व निवडून दिले आणि बघा किती बदल झाला. पण हा बदल सहज झाला नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यासाठी कष्ट घेतले गेले. जो काम करतो तोच सर्वांच्या निशाण्यावर असतो, जसे नरेंद्र मोदी विरोधकांच्या निशाण्यावर आहेत तसे जयकुमार गोरे सुध्दा विरोधकांच्या निशाण्यावर असतात, असे त्यांनी सांगितले. तसेच गोरे यांनी विभागासाठी केलेल्या विकासकामांबांबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.