Satara Political News : साताऱ्यातील खंडणीखोर मी पळवून लावले..! भर कार्यक्रमात शंभूराज देसाईंनी सांगितली 'ती' आठवण..

Satara MIDC : जिल्ह्याची औद्योगिक प्रगती होत असताना त्यात आडकाठी करणाऱ्या प्रवृत्ती शंभर टक्के मोडून काढणार..
Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : जिल्ह्याची औद्योगिक प्रगती होत असताना आडकाठी करणाऱ्या प्रवृत्ती शंभर टक्के मोडून काढणार असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील उद्योगदारांना दिली. 'मास औद्योगिक प्रदर्शन - 2023' चे उद्घाटन देसाईंच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील कोणत्याही एमआयडीसीमध्ये गुंड प्रवृत्ती खंडणीची मागणी करुन तुम्हाला त्रास देत असतील तर मला सांगा, मी गृहराज्यमंत्री असताना साताऱ्यातील खंडणीखोर पळवून लावत त्यांच्यावर चांगल्या कारवाया केल्या असल्याची आठवण देसाई यांनी भर कार्यक्रमात करुन दिली.

यावेळी शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, सातारा (Satara) एमआयडीसीमधून काही कंपन्या दुर्दैवाने बाहेर पाडल्या. त्यांना कोणाचा त्रास होत होता का? याचा विचार केला पाहिजे. समाजात काही प्रवृत्ती अशा असतात ज्या जाणीवपूर्वक आडकाठी निर्माण करतात. काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढी लोकं असतात त्यांना दुसऱ्याचे चांगले चालले की मला काय त्यातील मिळते का याचा प्रयत्न करतात.

Shambhuraj Desai
Dharashiv News: रोहन देशमुखांना खरेच लढायचे की पुन्हा कुणाचा 'गेम'करायचा आहे..?

नको त्या गोष्टी त्याठिकाणी जावून करायच्या, असे उद्योग सुरु असतात. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सांगतो स्थानिक प्रश्न सोडवायला आमदार आहेतच पण जिल्ह्यातील कोणत्याही एमआयडीसीमध्ये अशा गुंड प्रवृत्ती तुम्हाला त्रास द्यायला येत असतील तर मला किंवा माझ्या कार्यालयाला सांगा. जिल्ह्याची औद्यागिक प्रगती होत असताना त्याच्यात आडकाठी करणाऱ्या कोणत्याही प्रवृत्ती शंभर टक्के मोडून काढण्याच काम पालकमंत्री म्हणून करणार असल्याची ग्वाही मंत्री देसाई यांनी यावेळी दिली.

आपल्याकडे हे प्रमाण कमी आहे पण पूर्वी जे खंडणीबहाद्दर होते त्यांच्यावर मी गृहराज्यमंत्री असताना चांगल्या कारवाई केली असल्याची आठवणही त्यांनी भर कार्यक्रमात यावेळी त्यांनी करुन दिली. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भाेसले (shivendraraje Bhosale), मासचे जितेंद्र जाधव, राजेंद्र मोहिते, धैर्यशील भोसले, अस्लम फरास, उद्योजक नितीन माने, श्रीकांत पवार,वसंत फडतरे, दिलीप उटकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती हाेती.

साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर 'इंडस्ट्रियल एक्सपो 2023' चे उद्घाटन शंभूराज देसाई आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी एक्सपोमध्ये असणाऱ्या स्टॉलची त्यांनी पाहणी. दरम्यान एका ट्रॅक्टर स्टॉलवर देसाई यांनी स्वतः ट्रॅक्टरच्या ड्रायव्हर सीटवर बसून स्टेअरिंग हाती घेत शिवेंद्रराजे भोसले यांना देखील ट्रॅक्टरच्या बाजूला असणाऱ्या सीटवर बसवले.

(Edited by Amol Sutar)

Shambhuraj Desai
Hasan Mushrif : महायुतीत मंत्री होताच मुश्रीफांचा कॉन्फिडन्स वाढला, आता म्हणतात, अजून दोनवेळा आमदार होणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com