Satara MLC Election : जयंत पाटलांनी सातारच्या दोन राजेंवरून महायुतीवर निशाणा साधताच जयकुमार गोरेंचा पलटवार, म्हणाले "त्यांना त्यांच्या घरात कोणी..."

Jaykumar Gore on Jayant Patil : विधान परिषदेच्या उमेदवारीवरून त्यांनी महायुतीमध्ये साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजांना विचारत न घेताच निर्णय घेतले जात असावेत असा माझा अंदाज असल्याचं वक्तव्य केलं होतं. शिवाय हा माझा फक्त अंदाज आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते.
 Jaykumar Gore, Jayant Patil
BJP leader Jaykumar Gore addresses the media while responding to Jayant Patil's remarks on the Satara MLC Election and Mahayuti's candidate selection process.Sarkarnama
Published on
Updated on

Satara News, 11 Jun : सांगली सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील काल सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पाटील यांनी पत्रकार परिषदेतून महायुतीवर निशाणा साधला.

विधान परिषदेच्या उमेदवारीवरून त्यांनी महायुतीमध्ये साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजांना विचारत न घेताच निर्णय घेतले जात असावेत असा माझा अंदाज असल्याचं वक्तव्य केलं होतं. शिवाय हा माझा फक्त अंदाज आहे, दावा नव्हे, असंही जयंत पाटील म्हणाले होते.

जयंत पाटील यांचं हे वक्तव्य आता महायुतीच्या नेत्यांच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. कारण भाजप नेते तथा सातारचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, "जयंत पाटील यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. पण मी जर त्यांना त्यांच्या घरात कोणी विचारत नाही असे म्हटले तर कसे चालेल का? असा प्रश्न उपस्थित करत गोरेंनी जयंत पाटील यांना टोला लगावला.

 Jaykumar Gore, Jayant Patil
Sangamner Acid Attack Case : संगमनेर ॲसिड हल्ला प्रकरण तापले! दोन महिने उलटले तरी आरोपी फरार; डॉ. थोरातांनी पीडितेसाठी पोलिस अधीक्षकांकडे मागितला न्याय

तसंच यावेळी त्यांनी सांगली-सातारा विधान परिषदेमध्ये धैर्यशील कदम यांची उमेदवारी पक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केली असून आम्ही सगळ्यांनी ती स्वीकारली असल्याचंही यावेळी गोरेंनी स्पष्ट केलं. शिवाय दोन्ही राजांनी फ्रंट फुटवर राहून ही निवडणूक हाताळली आहे. पण विरोधकांचं कामच असतं कुठे काही फट सापडतेय का ते शोधणे आणि जयंत पाटील तर कसलेले राजकारणी आहे अशी मिश्किल टिप्पणी देखील गोरे यांनी केली आहे.

 Jaykumar Gore, Jayant Patil
Top 10 News : सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल,विरोधकांना दणका; सुनेत्रा पवार अमित शाहांच्या भेटीला, गडकरींचे नाशिकरांना मोठं गिफ्ट...यासह महत्वाच्या घडामोडी

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

काल साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, "सांगली-सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन राजेंना विचारत न घेताच निर्णय घेतला असावा असा माझा अंदाज आहे. यामुळे दोन्ही राजेंचा स्वाभिमान दुखावला गेला असून, अशा गोष्टी खपवून घेणे हा उदयनराजेंचा स्वभाव नाही. सातारकरांनी आपला स्वाभिमान काय आहे? हे या निवडणुकीत मतदानातून दाखवून द्यावे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com