Satara News : 'महावितरण'चा उपकार्यकारी अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात...

Bribery operation in Koregaon : कोरेगावमध्ये कारवाई; ठेकेदाराकडून दहा हजार स्विकारताना रंगेहाथ पकडले.
Satara News : 'महावितरण'चा उपकार्यकारी अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात...

Satara News : 'महावितरण' कंपनीच्या दोन कामांना मंजूरी देण्यासाठी एका ठेकेदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना येथील उपकार्यकारी अभियंत्यास आज सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. कोरेगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांचेवर कारवाई ही करण्यात आली.

वीज वितरण कंपनीचे खांब उभे करणे, वाहिन्या जोडणे तसेच जोडणी देणाऱ्या एका नोंदणीकृत ठेकेदाराची जे. के. इलेक्ट्रीकल नावाची फर्म आहे. त्यामार्फत ते वीजेचे खांब आणि वीज जोडणी करून देण्याची कामे घेत असतात. त्यानुसार या ठेकेदाराने घेतलेल्या तीन कामांपैकी सुरुवातीच्या कामाचे व नव्याने जमा केलेल्या दोन कामांना मंजूरी देण्यासाठी लाचेची मागणी केली होती.

Satara News : 'महावितरण'चा उपकार्यकारी अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात...
Ganpat Gaikwad : आमदार गणपत गायकवाडांचे केबल कार्यालय फोडले; चार जणांना अटक

यामध्ये महावितरणच्या कोरेगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मदन रामदास कडाळे (वय 46, सध्या रा. यादव कॉलनी, तामजाईनगर, सातारा, मुळ रा. मु. पो. कुरंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी 11 हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10 हजार रुपये लाच स्विकारताना त्यांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही कारवाई सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम पवार व सचिन राऊत, सहायक फोजदार शंकर सावंत, पोलिस हवालदार नितीन गोगावले, निलेश राजपुरे, पोलिस कॉन्स्टेबल विक्रम कणसे, तुषार भोसले, निलेश येवले, चालक पोलीस हवालदार मारुती अडागळे यांनी केली.

दरम्यान, लाच मागणीसंबंधाने नागरिकांची तक्रारी असल्यास पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा, सिटी सर्व्हे नंबर 524/अ, जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, सदरबझार येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

(Edited by Amol Sutar)

Satara News : 'महावितरण'चा उपकार्यकारी अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात...
PCMC Budget 2024 : पुराना है यह...! तब्बल पावणेसहा हजार कोटींचे बजेट; पण विदाऊट चर्चा अन् मिनिटांत मंजूर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com