Satara ZP election : पाटणकरांचा हक्काचा गट शंभुराज देसाईंनी पोखरला; मार्जिन घटल्यानं सत्यजितसिंहांचं टेन्शन वाढलं

Shambhuraj Desai Vs Satyajeet Patankar : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पाटण तालुक्यातील हेळवाक गटात सत्यजीत पाटणकर गटातील कार्यकर्त्यांनी शंभूराज देसाई यांच्या गटात प्रवेश केला असून स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
Workers from Satyajit Patankar group join Shambhuraj Desai camp in Patan.
Workers from Satyajit Patankar group join Shambhuraj Desai camp in Patan.Sarkarnama
Published on
Updated on

Satara ZP election : कोयना, केरा पश्चिम व वनकुसवडे पठार अशा विस्तीर्ण परिसरात जिल्हा परिषदेचा गोकूळ तर्फ हेळवाक गट येतो. या गटात गोकूळ तर्फ हेळवाक आणि येराड हे गण येतात. गट खुला असून, गोकूळ तर्फ हेळवाक गण अनुसूचित जाती महिला प्रगर्वासाठी व येराड गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांची कोंडी झाली आहे. गटात बहुरंगी, तर गणात दुरंगी लढती पाहावयास मिळतील, असे चित्र आहे.

गेली अनेक दशके गोकूळ तर्फ हेळवाक गटाने माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची पाठराखण केली आहे. जिल्हा परिषदेत किंवा पंचायत समितीत या गट, गणातून मंत्री शंभूराज देसाई गटाला चंचुप्रवेशही करता आलेला नाही. गेल्या निवडणुकीत गेली अनेक वर्षे कोयना विभागाचे नेतृत्व जिल्हा परिषद व पंचायत समितीत करणारे राजाभाऊ शेलार यांना तत्कालीन शिरळ गणात उमेदवारी दिली. त्यामुळे नाराजीचा सूर उमटला. मात्र, शेलार यांनीच विजय मिळवला.

2024 च्या विधानसभा निवडणुकीपासून मात्र या विभागात पाटणकरांचे मताधिक्य घटले आहे. पाटणकर गटाचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. केरा पश्चिम व वनकुसवडे पठारावर ते प्रमाण जास्त आहे. राज्याच्या सत्तेत शंभूराज देसाई हे वजनदार मंत्री आहेत. त्याचाही परिणाम जाणवत आहे. मात्र, यावेळी माजी सभापती मुक्ताबाई माळी यांचे पती बबनराव माळी यांच्या निधनामुळे येराड गणात त्यांची जास्त उणीव भासेल. पाटणकर गटांतर्गत असणारे मतभेदावर उपचार होणे गरजेचे आहे. ते झाले तर काठावर तरी बालेकिल्ला शाबूत राहील, असे चित्र आहे.

Workers from Satyajit Patankar group join Shambhuraj Desai camp in Patan.
Satara ZP Election : रामराजे, संजीवराजे नाईक निंबाळकरांची बालेकिल्ल्यातच दमछाक; विधानसभेनंतर बदलली गणित

गोकुळ तर्फ हेळवाक गण अनुसूचित जमाती महिला राखीव असून, त्यात शिवसेनेकडून सुधीर कारंडे व सुदर्शन वायकर यांच्या पत्नी, तसेच मंगल माने, भाजपमधून राजू मोहिते व बबनराव कांबळे यांच्या पत्नी इच्छुकांच्या यादीत आहेत. येराड गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून, शिवसेनेतून सुनील कदम, जगदीश पाटणकर, अमोल जगताप, दत्ता साळुंखे यांच्या पत्नी, भाजपमधून परशुराम शिर्के व माजी पंचायत समिती सदस्य (कै.) शामराव शिंदे यांच्या स्नुषा इच्छुक उमेदवार आहेत.

Workers from Satyajit Patankar group join Shambhuraj Desai camp in Patan.
Satara ZP Election : जिल्हा परिषदेसाठी माजी आमदार पुत्राची फिल्डिंग; आजी-माजी मंत्र्यांच्या पाया पडावं लागणार

चुरस वाढणार...

जिल्हा परिषद गट खुला असल्याने त्यासाठी शिवसेनेतून शैलेंद्र शेलार, गजानन कदम, सावळाराम लाड, अशोक पाटील, जगदीश पाटणकर, भाजपमधून सत्यजित शेलार, बाळा कदम, राष्ट्रवादीतून नरेश देसाई, काँग्रेसमधून डॉ. संतोष कदम, कोयना धरणग्रस्त संग्राम संघटनेचे चैतन्य दळवी ही इच्छुक उमेदवारांच्या यादीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com