Former CM On Satara Controversy : सातारा झेडपीतील राड्यावर माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा; ‘सरकारच्या स्थिरतेवर परिणाम...’

Zilla Parishad President Election : पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा झेडपी घटनेवर न्यायालयीन चौकशीची मागणी केली. या प्रकरणाचा राज्य सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

Karad, 23 March : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या घटनेची दखल घेत राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांनी त्या सर्व घटनेची न्यायालयीन चौकशी लावावी. त्या घटनेचा राज्य सरकारच्या स्थिरतेवरही परिणाम होऊ शकतो, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर ही भूमिका मांडली आहे, त्याला शिवसेना मंत्र्यांनी घेतलेली आक्रमक भूमिकेची पार्श्वभूमी आहे. आता शिवसेना हा विषय किती ताणणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सातारा जिल्हा परिषदेसाठी (satara Zilla Parishad) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी होती. त्यांच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्येमुळे त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने स्पष्ट बहुमत असतानाही भाजप नेतृत्वाने सत्ता बळकावण्याचा जो किळसवाणा प्रकार केला, हा लोकशाहीवरील काळा डाग आहे.

साताऱ्यातील घटना ही घृणास्पद आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्र सत्ता असताना साताऱ्यात घडलेली घटना अत्यंत वेदनाजनक व निंदनीय आहे. महाराष्ट्राचे राजकारण नक्की कोणत्या थराला गेलंय, तेच वीस तारखेला साताऱ्यात घडलेल्या घटनेवरून स्पष्ट होत आहे, असेही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हटले आहे.

Prithviraj Chavan
Satara ZP President : सातारा ZP अध्यक्षा प्रिया शिंदेंच्या ओबीसी दाखल्याबाबत शशिकांत शिंदेंचा मोठा दावा; ‘आम्ही कोर्टात जाणार...’

चव्हाण म्हणाले, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्यातच लोकशाहीची अशी हत्या होत असेल, तर राजकारणाची पातळी किती खालावली आहे, हेच यातून दिसून येते. सत्ता हेच सर्वस्व मानून महाराष्ट्राचा यशवंत विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे.

Prithviraj Chavan
Satara ZP : सातारा ZP सदस्य बापू शिंदेंनी तिसऱ्यांदा ठासून सांगितलं! SP तुषार दोशींसह LCB प्रमुख अरुण देवकर अडचणीत

पोलिस आणि प्रशासनाची भूमिका देखील गंभीर प्रश्न उपस्थित करणारी होती. सुदैवाने जिल्ह्यातील माध्यमांनी न भिता दिलेल्या बातम्या आणि घटनांच्या केलेल्या वस्तुनिष्ठ विश्लेषणामुळे सत्य समोर आले आहे. त्यांचे अभिनंदन. आता राज्यपाल महोदयांनी सर्व घटनेची न्यायालयीन चौकशी लावली पाहिजे. या घटनेचे पडसाद राज्य सरकारचा स्थिरतेवर होण्याची शक्यता आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com