Satara ZP : सातारा ZP मध्ये सिनेस्टाईल थरार : राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना सभागृहात जातानाच अटक, भाजपने आणखी 'दोघांना' शंभुराज देसाईंसमोरच फोडलं

Satara ZP : साताऱ्यात बहुमताचा आकडा नसतानाही भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धक्का देत सत्ता खेचून आणली. प्रिया शिंदे अध्यक्ष तर राजू भोसले उपाध्यक्ष बनले असून सभागृहात अभूतपूर्व नाट्य पाहायला मिळाले.
Satara Zilla Parishad
Satara Zilla ParishadSatara
Published on
Updated on

Satara ZP : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या प्रिया शिंदे विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली. राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर बहुमत असूनही सत्ता गमावण्याची वेळ आली. दुसऱ्या बाजूला ही सत्ता मिळवण्यासाठी भाजपने सभागृहाबाहेर आणि सभागृहात अनेक खेळ्या केल्या. अध्यक्षनिवडीवेळी जिल्हा परिषदेच्या आवारात आणि सभागृहात सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला.

भाजपने राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांवर शिवसेना सदस्य बापू शिंदे यांच्या अपहरणाचा आरोप करत गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यात पोलीस अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अटक करणार अशी चाहूल मंत्री शंभुराज देसाई आणि मंत्री मकरंदआबा पाटील यांना लागली. खबरदारीचा उपाय म्हणून स्वतः मंत्र्यांनी या सदस्यांना आपल्या गाडीतून थेट जिल्हा परिषदेत आणले.

शंभुराज देसाई या सर्वांना सभागृहाकडे घेऊन जात होते. त्याचवेळी जिन्यात पोलिसांनी अटक करण्यासाठी या दोघांनाही अडवलं. यावेळी पोलीस आणि शंभुराज देसाई या दोघांमध्येही बरीच झटापट झाली. याच झटापटीत शंभुराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाली, त्यांचा रक्तदाबही वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. पण पोलिसांनी सभागृहात जातानाच दोघांनाही अटक केल्याची माहिती आहे.

मतदानावेळीही राडा :

65 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत भाजपच्या 27 जागा निवडून आल्या आहेत. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने निवडणूक पूर्व आघाडी केली होती. या आघाडीतील राष्ट्रवादीला 20 आणि शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. स्वाभिमानीच्या एका सदस्यानेही राष्ट्रवादीसोबतच गटनोंदणी केली आहे. शिवाय काँग्रेसचाही 1 सदस्य याच आघाडीसोबत होता. असे मिळून या आघाडीकडे 37 चे संख्याबळ होते. बहुमतापेक्षा हा आकडा चारने जास्त होता.

Satara Zilla Parishad
Satara ZP : मोठी बातमी : सातारा जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष; जयकुमार गोरे-शिवेंद्रराजेंनी शेवटच्या क्षणी गेम फिरवला, राष्ट्रवादीचे सदस्य फुटले

आजच्या झालेल्या निवडणुकीत भाजपला 33 आणि राष्ट्रवादी-शिवसेनेच्या उमेदवाराला 30 मते मिळाली. भाजपच्या उमेदवार प्रिया शिंदे यांचा 3 मतांनी विजय झाला. या विजयासाठी भाजपने मागच्या मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करायला सुरुवात केली होती. भाजपने सगळ्यात अपक्ष सदस्या विद्या वेताळ आणि राष्ट्रवादीच्या सदस्या लता कर्णे यांना आपल्या बाजूने वळवले. भाजपला अजूनही बहुमतासाठी 4 सदस्यांची गरज होती.

Satara Zilla Parishad
Satara ZP President : साताऱ्यात राष्ट्रवादीचा गेम : भाजपने ऐनवेळी हुकमी एक्का बाहेर काढला; पळवापळवी अन्‌ केसेस, 24 तासांत बरंच काही घडलं...

यानंतर भाजपने मोठा डाव खेळत शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली. त्यामुळे महेश शिंदेंच्या 2 समर्थक सदस्यांनी भाजपला मतदान केले. शिवाय 2 सदस्यांना सभागृहात जबरदस्ती भाजपला मतदान करायला लावल्याचा आरोप आहे. मंत्री शंभुराज देसाई यांच्यासमोरच हा सगळा प्रकार घडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com