Satej Patil: पुणे शिक्षक शिवसेना, भाजपच्या उमेदवारांकडून मतदारांना लक्ष्मी दर्शन, सतेज पाटलांच्या आरोपावरून खळबळ

Pune Teacher Constituency: पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांकडून मतदारांना लक्ष्मीदर्शन सुरू असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. काँग्रेसचे जयंत आसगांवकर यांना मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune Teacher Constituency News: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर यांना बारामती क्रिडाईचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याच्या घोषणेदरम्यान काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांवर गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे वातावरण तापण्याची शक्यता आहे.

यावेळी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या शिवसेना आणि भाजपच्या शिक्षक उमेदवारांवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे हे डमी उमेदवार असून, ते कोल्हापूर जिल्ह्यात सक्रिय आहेत, तर शिवसेनेचे उमेदवार सानप यांच्याकडून पुण्यात मतदारांना ‘लक्ष्मीदर्शन’ घडवण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी केला.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका महाराष्ट्राचे भवितव्य घडवणाऱ्या असल्याचे सतेज पाटील यांनी म्हटले. या निवडणुकीत महायुतीकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी शिक्षक मतदारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले.

Satej Patil
Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँक निवडणुकीत अशोक पाटील निलंगेकरांसह तेरा जणांचे अर्ज बाद!

“पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपकडून मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन सुरू आहे. महायुतीच्या माध्यमातून लक्ष्मीदर्शनाचा नवीन पायंडा सुरू झाला आहे. सुज्ञ शिक्षकांनी अशा कोणत्याही प्रकाराला बळी पडू नये,” असे पाटील म्हणाले.

शिक्षक मतदारांना आवाहन करताना पाटील म्हणाले, अल्पकालीन आमिषापेक्षा पुढील सहा वर्षांचा विचार करावा. “एक दिवस चांगला असेल, मात्र पुढील सहा वर्षे वाईट असतील. त्यामुळे पाच जिल्ह्यांतील शिक्षकांनी जयंत आसगावकर यांना मतदान करावे.”

Satej Patil
Gokul Election Result : "सतेज पाटील फेक नरेटिव्ह पसरवण्यात यशस्वी"; गोकुळमध्ये भाजपचा सुपडासाफ झाल्यानंतर धनंजय महाडिकांची पहिली प्रतिक्रिया

‘गोकुळच्या निकालामुळे भाजपविरोधी वातावरण’

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा संदर्भ देत सतेज पाटील यांनी महायुतीवर टीका केली. महायुतीविरोधात एकत्रितपणे लढल्यास विजय मिळवता येतो, असा संदेश गोकुळच्या निवडणुकीतून संपूर्ण महाराष्ट्रात गेल्याचा त्यांनी सांगितले. महायुती विरोधात लढलो तर विजयी होतो हा संदेश गोकुळ निवडणूकीमुळं संपूर्ण महाराष्ट्रात गेला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजप विरोधी वातावरण तयार झाले आहे. त्याचा फायदा पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आम्हाला होईल. असेही आमदार पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com