Satej Patil allegations : महाडिक आमदार असलेल्या दक्षिण मतदारसंघावर सतेज पाटलांचा मोठा आरोप; 12 हजार मतदार....

Mahadik south constituency News : राज्यातील विविध ठिकाणावरून मतदान यादीवर शंका उपस्थित करत विरोधकांनी निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत.
Satej Patil, Amal Mahadik
Satej Patil, Amal MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolahpur News : राज्यासह देशभरात मतदान यादीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलीच फैलावर घेतले आहे. राज्यातील विविध ठिकाणावरून मतदान यादीवर शंका उपस्थित करत विरोधकांनी निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. अशा परिस्थितीत कोल्हापुरातून देखील आमदार सतेज पाटील यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात मतदान यादीतील दुबार मतदाराबाबत धक्कादायक आरोप केला आहे. त्याठिकाणी भाजपचे अमल महाडिक हे आमदार आहेत. सतेज पाटील यांच्या या आरोपामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत संपवाव्यात अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. मात्र, मतदार यादीतील घोळ हा दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात बारा हजार नाव ही डुप्लिकेट असल्याचे आम्हाला सापडले. त्याची रीतसर माहिती निवडणूक आयोगाकडे दिली आहे, असा गंभीर आरोप विधिमंडळातील काँग्रेसचे (Congress) गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.

Satej Patil, Amal Mahadik
Ashok Chavan : चिखलीकर-चव्हाण संघर्ष; नांदेडमध्ये कोणाचा पक्ष नंबर वन ठरणार?

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे (BJP) अमल महाडिक हे आमदार आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्याची 'घर टू घर' माहिती संकलनाची काम सुरू आहेत. त्यातील सोळाशे नावे सापडली नाहीत. अशा मतदारांनी पुन्हा डबल मतदान केले का? ही आम्हाला शंका आहे. दुबार नावे डिलीट करण्यासंदर्भात 16 जुलैला निवडणूक आयोगाने पत्र काढले. मात्र, आता ही नावे डिलीट होणार नाहीत, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

Satej Patil, Amal Mahadik
BJP Politics : 'अब की बार 70 पार', ठाण्यात भाजपचा स्वबळाचा नारा, एकनाथ शिंदेंना घेरलं!

निवडणूक आयोगाची दुटप्पी भूमिका असल्याने वरिष्ठ नेतेमंडळी या आयोगाला भेटले. दुबार नावे डिलीट करा आणि एक पत्त्यावर अनेक मतदान आहे. ते डिलीट करण्याची मागणी वरिष्ठ नेत्यांनी केली असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी यावेळी दिली.

Satej Patil, Amal Mahadik
Sharad Pawar NCP: तब्येतीच्या कारणाहून राजीनामा घेतलेल्या रेखा खेडकर म्हणतात 'मी ठणठणीत...'; राजीनाम्यामागे कोण?

चार वर्षे महायुतीचे सत्ता आहे. त्यांनी कोल्हापूरसाठी काय केले? शंभर कोटी रस्त्यांचे काय झाले रस्त्यांची धूळदान उडाली आहे. खड्डे भरायला पैसे महापालिकडे नाहीत. सत्तेत येऊन नऊ महिने झाले तुम्ही काय केले? आता पालकमंत्री बैठक घेत आहेत, त्यांचे आणि आमदार क्षीरसागर यांचे नेमके काय चाललंय? असेही पाटील म्हणाले.

Satej Patil, Amal Mahadik
Sharad Pawar : शरद पवारांना तीन टर्मच्या महिला आमदाराचा रामराम : अजितदादांच्या चालीने भाजपही टेन्शनमध्ये

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com