Narendra Modi criticism : फसलेलं परराष्ट्र धोरण, अमेरिका अन् ट्रम्प यांच्या दबावाखाली घेतलेला निर्णय : दिल्लीतूल भाषण ठोकणाऱ्या पंतप्रधानावर काँग्रेस नेत्याची टीका

India foreign policy debate Nrews : अमेरिकेबरोबर संवाद साधताना इतर सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरलेले आहेत. टॅक्स संदर्भात परराष्ट्र मंत्र्यांना विचारल्यावर ते म्हणतात मला माहित नाही. भारतातल्या दोन प्रमुख मंत्र्यांनी एकमेकाकडे बोट दाखवले,हे जे विस्कटलेलं धोरण आहे याचा परिणाम आता भारतातल्या सामान्य नागरिकांवर व्हायला लागला आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Kolahapur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेला आवाहन म्हणजे फसलेले परराष्ट्र धोरण आहे. अमेरिकेच्या आणि ट्रम्प सरकारच्या दबावाखाली भारताने केलेला करार त्याचा हा परिणाम आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आज मैत्री कुणाशीच राहिलेली नाही, अशी देशाची आमच्या परिस्थिती आहे. अमेरिकेबरोबर संवाद साधताना इतर सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरलेले आहेत. टॅक्स संदर्भात परराष्ट्र मंत्र्यांना विचारल्यावर ते म्हणतात मला माहित नाही. भारतातल्या दोन प्रमुख मंत्र्यांनी एकमेकाकडे बोट दाखवले,हे जे विस्कटलेलं धोरण आहे याचा परिणाम आता भारतातल्या सामान्य नागरिकांवर व्हायला लागला आहेत, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

पश्चिम बंगालची निवडणूक झाल्यानंतर सिलेंडरचा दर वाढला. पेट्रोल-डिझेलचा देखील आज तुटवडा आहे. परंतु ज्यावेळी किंमत कमी असताना क्रूड ऑइल इम्पोर्ट केलं जात होतं, त्याचा फायदा देशातल्या जनतेला 5-7 वर्षांमध्ये मिळाला. परंतु जेव्हा धोरण चुकते. त्याचा फटका जेव्हा सरकारला बसतो. तेव्हा ते लोकांवर ढकललं जातं. ज्यावेळी पंतप्रधान असं बोलतात त्यावेळी पॅनिक निर्माण होतं. कोविडमध्ये थाळी वाजवा म्हणाले होते, तसं असेल तर आम्हाला माहित नाही, असेही आमदार पाटील (Satej Patil) म्हणाले.

Narendra Modi
Maharashtra News Live Update: पोलिसांनी आंदोलकांना हटवलं, चार तासांनंतर मुंबई-बंगळूरु महामार्गावरील वाहतूक सुरू

एकूणच मेटावर काही दबाव आहे का, अशी अवस्था आहे. राहुल गांधींचा एखादा व्हिडिओ कोट्यावधी लोकांजवळ पोहोचतो तेव्हा तो अचानक थांबला जातो, तो टाईम लाईनवर दिसत नाही. सरकारने ही एवढी धास्ती का घेतली गेलेली आहे? ते कळत नाही. जगभरात सोशल मीडिया एक मोठं शस्त्र आहे, त्याचाच मेटावर सुद्धा सरकारचा दबाव आहे, अशी परिस्थिती आहे. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांच्या पोस्टवर ते बोलत होते.

Narendra Modi
Maharashtra News Live Update : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

पंचगंगा प्रदूषणाबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले, गेल्यावेळी देखील आम्ही काही डीपीआर तयार केले होते. सरकारने या प्रदूषणासंदर्भात त्वरित ऍक्शन घेणे गरजेचे आहे. आता पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे पुढच्या सर्व गावांना प्रदूषित पाणी जात आहे.

Narendra Modi
Maharashtra News Live Update : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

आता ट्रिपल इंजिन सरकार आहे. तिघांचीच भांडण मिटत नाहीत, नागरी समस्यांकडे बघायला त्यांना वेळ मिळतोय की नाही माहित नाही. परंतु तिघांची भांडण तुम्ही कॅबिनेटमध्ये मिटवता तसे आता लोकांचे प्रश्न मिटवा, अशी आमची विनंती आहे, असा टोलाही सतेज पाटील यांनी हाणला.

Narendra Modi
Maharashtra Politics Live Update : “त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही, मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com