Satej Patil : प्रभाग रचनेवरून सतेज पाटलांनी थेट दमच दिला; म्हणाले...

Maharashtra politics news: प्रभाग रचना करत असताना कोणताही दबाव अधिकाऱ्यांवर आणू नये. प्रत्येक प्रभाग रचनेवर काँग्रेसचे लक्ष असणार आहे.
Satej Patil
Satej Patil Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : महापालिका निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना करण्याचा अधिकार यापूर्वी निवडणूक आयोगाला होता. दोन वर्षापूर्वी हे अधिकार नगर रचना आणि आरडीसी विभागाला देण्यात आले आहेत. आमचा आक्षेप असा आहे की? हे अधिकार त्यांना देऊ नये. त्यामुळे एक प्रकारे हे अधिकार राज्य सरकारकडे आले आहेत. प्रभाग रचना करत असताना कोणताही दबाव अधिकाऱ्यांवर आणू नये. प्रत्येक प्रभाग रचनेवर काँग्रेसचे लक्ष असणार आहे. दबावाखाली कोणतेही काम करू नये, अशा शब्दांत शासकीय अधिकाऱ्यांना काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सुनावले आहे.

अहमदाबाद विमान दुर्घटनेवर बोलताना काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी, ब्लॅक बॉक्स सापडला आहे, त्यानंतर नेमके काय घडले हे समोर येईल. सर्व माहिती पब्लिक डोमेनमध्ये यावी, इतकीच आमची मागणी आहे. भारतात ही घटना घडल्यामुळे याच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे आहे. इतर प्रवाशांमध्ये भारताबद्दल विश्वास निर्माण करणे आता महत्त्वाचे आहे. त्यामुळे सरकारने तांत्रिक दोष किंवा जी काही अपघाताची कारणे असतील ती लोकांसमोर आणली पाहिजेत.

Satej Patil
Ahmedabad Plane Crash:Raj Thackeray यांनी अपघातग्रस्त विमानाची कुंडली मांडली | Boeing 787 Dreamliner

यापुढील काळात अशी दुर्घटना होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असून याचे महत्व आणि विश्वास सरकारने देणे अपेक्षित आहे. या सर्व प्रकरणाकडे गांभीर्याने पहावे, पीडितांच्या कुटुंबियांना आधार देणे सध्याच्या घडीला महत्त्वाचे आहे. पाहणी आणि फोटो सेशनमध्ये काय मिळणार आहे? याबाबत आम्हाला माहिती नसल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

Satej Patil
Ahmedabad Plane Crash : कोसळलेल्या विमानात होता 'हादरवणारा' पेट्रोल साठा : स्फोटात तयार झालं लोखंडही वितळवणारं तापमान

या समितीला कार्यकाळ दिला आहे का? याबाबत मला कल्पना नाही. महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, आमचे सरकार आले की कर्जमाफी करू. अजित दादा म्हणतात मी या ठिकाणी कधी शब्द दिला होता? बच्चू कडू यांना आश्वासन दिले आहे, त्यात कार्यकाळ लिहला पाहिजे. किती दिवसात ही समिती अहवाल देईल?किती दिवसात निर्णय देणार? हे महत्वाचे आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत म्हणून ही समिती स्थापन होता कामा नये. दिखाव्यासाठी समिती स्थापन न होता तातडीने आणि किती दिवसात कर्जमाफी करणार त्याचा निर्णय झाला पाहिजे, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.

Satej Patil
Ravindra Dhangekar Politics : महायुतीत प्रवेश पण रवींद्र धंगेकर आजही परकेच? मिले सुर मेरा तुम्हारा होईना!

मधल्या काळात रुग्णवाहिकेचा विषय आला होता, तो लोकांसमोर मांडला होता. ठेका कोणाला द्यायचा द्या, पण गरिबांना सेवा द्या. आम्ही योजना अनेक सुरू केल्या. त्या योजना या सरकारने मोडकळीस आणल्या आहेत. नवा माणूस आणण्यासाठी हा खेळ सुरू आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नवे काय करायचे ते करा पण लोकांना सेवा द्या? अशा शब्दात सतेज पाटील यांनी आरोग्य यंत्रणेवरून सरकारला सुनावले आहे.

Satej Patil
BJP Workers Join NCP - प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या गृह जिल्ह्यात भाजपला धक्का; कार्यकर्ते पवारांच्या राष्ट्रवादीत!

कोल्हापूर महानगरपालिकेतील अनेक प्रमुख पदाधिकारी सतेज पाटील यांची साथ सोडत आहेत. यावरून बोलताना, कोण आले कोण गेले मला फरक पडत नसल्याचे सांगत लोक आम्हाला प्रतिसाद देतात, जे काही राजकारण घडले हे लोकांना आवडले नाही. त्यामुळे लोकांचा महाविकास आघाडीकडे कल असल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

Satej Patil
Raj-Uddhav Thackeray Meeting : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट टाळली? 'त्या' पत्रावरून वेगळीच चर्चा

कायदा आणि सुव्यवस्थेवरून बोलताना, नवीन जिल्हा प्रमुख आलेले आहेत. गेल्या जिल्हा पोलीस प्रमुखांचा अनुभव कोल्हापूरकरांनी घेतलेला आहे. त्यांनी काय दिवे लावले असे मी म्हणणार नाही. पण कोल्हापूरमध्ये काय काय घडलं हे संपूर्ण लोकांनी पाहिलेले आहे. नव्या जिल्हा पोलीस प्रमुखांकडून आम्हाला अपेक्षा आहेत. गुन्हेगार असू देत किंवा गैरकृत्य असो, ड्रग्ज वाढलेला वापर असो. ते सर्वांवर पायबंद घालतील, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे पाटील म्हणाले.

Satej Patil
Kolhapur Election: यंदा कोल्हापूर महापालिकेची लढाई सोपी नसणार, मातब्बर नेत्यांसह इच्छुकांनाही घाम फोडणार; 'हे' मोठं कारण आलं समोर

यापूर्वी सलोखा बैठका होत होत्या, आता पुन्हा एकदा गृह विभागाने असे उपक्रम सुरू करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्यात गृह खाते हे स्वतंत्र असले पाहिजे, व्यक्ती स्वतंत्र असली पाहिजे, अशी आमची कायम मागणी असल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

Satej Patil
Jayashree Patil : जयश्रीताई राष्ट्रवादीच्या वाटेवर असतानाच माजी पालकमंत्र्यांची भाजपची ऑफर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com