Satej Patil: "चंद्रकांत पाटलांच्या बदनामीसाठी सतेज पाटलांनी सोशल मीडिया मॅनेज केला"; शिवसेना आमदारांनं थंड झालेला वाद काढला उकरून

Satej Patil: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ मर्यादित अर्थात गोकूळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना धमकीवजा इशारा दिला होता. त्यानंतर सोशल मीडियातून चंद्रकांत पाटलांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं.
Gokul Chairman Election; Chandrakant Patil And Satej Patil
Gokul Chairman Election; Chandrakant Patil And Satej PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satej Patil: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ मर्यादित अर्थात गोकूळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांना धमकीवजा इशारा दिला होता. त्यानंतर सोशल मीडियातून चंद्रकांत पाटलांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेच आमदार राजेश क्षीरसागर हे चंद्रकांत पाटलांसाठी धावून आले आहेत. सतेज पाटलांनी आपल्याकडच्या संस्थांच्या माध्यमातून सोशल मीडिया मॅनेज केला आणि चंद्रकांत पाटलांची बदनामी घडवून आणली असा आरोप त्यांनी केला आहे. तसंच चंद्रकांत पाटील काहीही चुकीचं बोललेले नाहीत, अशा शब्दांत त्यांचं समर्थनही केलं.

राजेश क्षीरसागर म्हणाले, "आजचा सोशल मिडिया वेगळा आहे. सतेज पाटलांच्या मोठ्या संस्था आहेत, डी. वाय. पाटील ग्रुप आहे. त्यांनी लोकं बसवली आहेत, जी तातडीने पोस्ट करुन बदनाम करतात. सोशल मीडिया मॅनेज केली म्हणजे चंद्रकांतदादा खराब आहेत असं होत नाही. चंद्रकांत पाटील राज्याचे नेते आहेत, ते काय चुकीचं बोलेले? मुख्यमंत्र्यांचा अवमान करत असाल तर चंद्रकांतदादा बोलले ते बरोबरच आहे. आता काढायचं म्हटलं की, भरपूर काढता येईल. त्यांची (सतेज पाटील) सगळी हॉटेलं चुकीच्या पद्धतीने बांधली आहेत. बोलण्यासारखं बरचं आहे, मात्र राजकारणात मर्यादा असल्या पाहिजेत," अशा शब्दांत राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटलांना इशाराही दिला.

Gokul Chairman Election; Chandrakant Patil And Satej Patil
Phone Tapping: राहुल गांधींबरोबरच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या 'या' प्रमुख नेत्याचाही फोन टॅप? नेमकं काय सुरुए?

गृहराज्यमंत्री असताना काय केलं?

दरम्यान, २०१३ साली मी आमदार होतो, त्यावेळी माझ्यावर हल्ला झाला. विनयभंगाचा गुन्हा माझ्यावर दाखल केला गेला, त्यावेळी बंटी पाटील गृहराज्यमंत्री होते. मग याला काय म्हणावं लागेल? त्याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. माझ्यावर हल्ला कसा केला गेला? स्टेजवर माझं कुटुंब असताना मी विनयभंग कसा करु शकतो जाणीवपूर्वक सरकारला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. मात्र, जनता सूज्ञ आहे. परत एकदा देशात २०२९ला मोदींची सत्ता लोकं आणतील आणि हिंदू सरकार आल्याशिवाय राहणार नाही, असंही आमदार क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

Gokul Chairman Election; Chandrakant Patil And Satej Patil
Aditi Tatkare: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून फोन! नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या अदिती तटकरे तातडीने मुंबईला रवाना

शिरसाटांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध

विधानसभेला आम्ही तुमचे १० उमेदवार पराभूत केले, तुम्ही काय आम्हाला २०२९चं सांगता. सतेज पाटलांकंडून गोकुळच्या नावावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोपही क्षीरसागर यांनी यावेळी केला. तसंच संजय शिरसाट यांच्या घरावरील हल्ल्याचा आपण जाहीर निषेध करतो असंही आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. शिवसैनिकाच्या घरावर हल्ला करणं सोपं नसतं, संजय शिरसाट त्या गोष्टींना तोंड देण्यासाठी खंबीर आहेत, ते त्याला प्रतिउत्तर देतील. हल्लेखोरांना शासन पाठीशी घालणार नाही, असंही क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.