Phone Tapping: राहुल गांधींबरोबरच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या 'या' प्रमुख नेत्याचाही फोन टॅप? नेमकं काय सुरुए?

Phone Tapping: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी नुकताच आपला फोन टॅप होत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यावरुन त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीकाही केली आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiRahul Gandhi
Published on: 
Updated on: 

Phone Tapping: लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी नुकताच आपला फोन टॅप होत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. यावरुन त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीकाही केली आहे. पण आता राहुल गांधींबरोबरच महाराष्ट्रातील एका प्रमुख नेत्यााच फोन टॅप केला जात असल्याची चर्चा सुरु आहे. खुद्द या नेत्यानंच तसा दावा केला आहे.

राहुल गांधींबरोबरच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपलाही फोन टॅप केला गेल्याचा दावा केला आहे. नाना पटोले यांनी आरोप करताना म्हटलं की, मोदींचे जे वारसदार आहेत आपल्या महाराष्ट्रात अर्थात फडणवीस सरकार. या सरकारनं रश्मी शुक्लांच्या माध्यमातून माझेही फोन टॅप केले आहेत. एकनाथ खडसेंचे फोनही सरकारनं टॅप केले होते. रावसाहेब दानवेंचे केले होते, खूप लोकांचे केले होते. यांचं आता वरच्यापासून फोन टॅपिंग सुरु आहे मग फडणवीस सरकार करु शकतं तर मोदी सरकार सोडणार का?

Rahul Gandhi
Aditi Tatkare: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून फोन! नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या अदिती तटकरे तातडीने मुंबईला रवाना

राहुल गांधींना ब्लॅकमेल करण्यासाठी ते विरोधीपक्ष नेते असतानाही या पद्धतीचं फोन टॅपिंग होणं म्हणजे हे सरकार किती बदमाशीवर आलं आहे हे कळतंय. या लेव्हलवर हे गेले आहेत आणि खालच्या दर्जाचं राजकारण आज देशपातळीवर पहिल्यांदा भारतात होत आहे, हे दुर्देवी आहे. त्यामुळं राहुल गांधींनी व्हिडिओद्वारे जी भूमिका मांडली आहे, ती वास्तविकता असून याबाबत मोदींनी तातडीनं खुलासा करावा. कोणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला टाकण्याचं काम जर देशाचे पंतप्रधान स्वतः करत असेल तर आम्ही लोकांमध्ये जाऊन हे सरकार किती नालायक आहे? लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत आहे, हे आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगू, असंही नाना पटोले यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं.

Rahul Gandhi
Drought Maharashtra News: दुष्काळामुळे महाराष्ट्रात विदारक स्थिती! ६२ हजार कोटींच्या शेतपिकांचं नुकसान; कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज

राहुल गांधांचा आरोप काय?

राहुल गांधी यांनी व्हिडिओद्वारे आपला फोन टॅप केला जात असल्याचा आरोप केला आहे. केंद्र सरकारनं त्यांनी हा आरोप केला असून जर मोदींनी समोरा समोर माझ्याशी डिबेट केलं तर सर्वांना कळेल की, कोणाला परदेशी शक्तींकडून नियंत्रित केलं जातंय? नेमकं कोण देशाच्या विरोधात काम करतंय? आणि इतरही अनेक गोष्टींचा तपशील माझ्या फोनमध्ये आहे. हे सरकारला चांगलंच माहिती आहे, त्यामुळं मोदी सरकारकडून माझा फोन टॅप केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.