Satej Patil: "लक्षात ठेवा! कोल्हापूर स्वाभिमानी, अहंकाराची मस्ती उतरवतंच"; अध्यादेश लागू झाल्यानं सतेज पाटील आक्रमक, केली मोठी घोषणा

Satej Patil: गोकूळच्या अध्यक्षपदासाठीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारनं केलेल्या सहकार कायद्यातील सुधारणा अध्यादेशावर आज राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांनी सही केली. त्यामुळं आता हा कायदा लागू झाला आहे.
Satej Patil
Satej Patil Gokul NewsSatej Patil Wins Gokul Election 2026
Published on: 
Updated on: 

Satej Patil: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ मर्यादित अर्थात गोकूळच्या अध्यक्षपदासाठीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारनं केलेल्या सहकार कायद्यातील सुधारणा अध्यादेशावर आज राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांनी सही केली. त्यानंतर राजपत्रात हा अध्यादेश प्रकाशितही करण्यात आला आहे. त्यामुळं आता या अध्यादेशाचं कायद्यात तात्काळ प्रभाव रुपांतर झालं आहे. यापार्श्वभूमीवर सतेज पाटील हे आक्रमक झाले असून ट्विट करुन त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे.

लक्षात ठेवा...

सतेज पाटील ट्विटमध्ये म्हणतात, "तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वास जिंकून दाखवू शकला नाही! मग अध्यादेशाच्या आडून गोकुळमध्ये आपली माणसं घुसवून सभासदांचा कौल कशाला तुडवता? चार नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार देणं म्हणजे सभासदांच्या कौलावर सरकारी दरोडा आणि कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाचा अपमान! घाम आमच्या दूध उत्पादकांचा, संस्था आमच्या सभासदांची आणि हुकूम तुमचा? गोकुळ तुमची जहागीर नाही! लक्षात ठेवा, कोल्हापूर स्वाभिमानाशी तडजोड करत नाही; अहंकाराची मस्ती उतरवतं. फक्त वेळ येण्याची वाट पाहतं!

दसरा चौकात मोर्चा

"आता यायला लागतंय! कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा, 9 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता, दसरा चौकात" अशा शब्दांत सतेज पाटील यांनी सरकारच्या या कारभाराविरोधात थेट सर्वसामान्य कोल्हापुरकरांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं आहे. लक्ष्मीपुजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी ९ तारखेला आता कोल्हापुरात सतेज पाटलांच्यावतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.