

Solapur, 04 July : उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार आज (ता. ०४ जुलै) प्रथमच पंढरपुरात आल्या होत्या. पंढरपूरमध्ये वारकरी भक्त निवासाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा व्हीआयपी प्रोटोकॉल बाजूला ठेवून वारकऱ्यांच्या पंक्तीत जमिनीवर बसून भोजनाचा आस्वाद घेतला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या साधेपणाने उपस्थित वारकरीही अचंबित झाल्याचे दिसून आले.
पंढरपुरात उभारण्यात आलेल्या वारकरी भक्त निवासाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज शहरात आल्या होत्या. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वारकारी निवासाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वारकऱ्यांसाठी भोजनाची सोय करण्यात आली होती.
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा व्हीआयपी प्रोटोकॉल असतो. त्यानुसार त्यांच्यासोबत शासकीय लवाजमा कायम असतो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सुरक्षेमुळे हे व्हीआयपी प्रोटोकॉल पाळावे लागतात. मात्र, काही राजकारणी आपला साधेपणा कायम जपत असतात, त्याचे दर्शन आज पंढरपुरात आले.
वारकरी भवनाच्या उद्घाटनानंतर व्हीआयपी मंडळींसाठी भोजनाची स्वतंत्र सोय करण्यात आली होती. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतंत्रपणे न जेवता वारकऱ्यासोबत पंक्तीत बसून भोजनाचा आस्वाद घेतला. वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांची सुनेत्रा पवार यांनी विचारपूस आणि सुविधांबाबत माहिती घेतली.
वारकरी संप्रदायातील समतेचे दर्शन घडविणारा सुनेत्रा पवार यांचा हा प्रसंग आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वसामान्य वारकऱ्यांमध्ये मिसळून भोजन करणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या या साधेपणाच्या कृतीची शहरात चर्चा रंगली असून वारकरी आचंबित झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.