
Solapur, 09 June : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्हीकडून सध्या साद-प्रतिसाद दिला जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे इंगित माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ‘महाराष्ट्र आणि मराठी माणसाठी एकत्र येत आहोत, हे त्यांचं सोंग आणि ढोंगं आहे. खरं कारण वेगळंच आहे,’ असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
माजी आमदार शहाजी पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सध्या सुरू आहे. हे दोघेही राजकारणाच्या बुडत्या नावेत बसलेले आहेत, त्यामुळे या नावेतून त्या नावेत आणि त्या नावेतून ह्या नावेत बसले तरी नाव बुडण्याची काही थांबणार नाही, त्यामुळे त्यांचा राजकीय उद्धार अजिबात होणार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मध्यस्थी करेल, असा नेता आता शिवसेनेत राहिलेले नाही, त्यामुळे त्यांना नातेवाईकांना आधार घ्यावा लागत आहे.
गजानन कीर्तीकरांचं सध्या वय झालं आहे, त्यामुळे त्यांच्या लक्षात येत नाही, की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून उद्धव ठाकरे यांनी फारकत घेतल्यामुळे एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांना वेगळी भूमिका घ्यावी लागली. आमची नैसर्गिक मैत्री भाजपबरोबर आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यातही आमची मैत्री भाजपबरोबच कायम राहील, असेही शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) यांनी सांगितले.
माजी आमदार पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे दोन्ही बहीण-भाऊ आषाढी एकादशीच्या वेळी एकत्र येतील, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले. पण, हे दोघे एकत्र येण्याला उशीर झाला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचे ज्येष्ठत्व मान्य करून अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र यावं. देशाच्या प्रगतीच्या गतिमान राजकारणात मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांनी देशाला चांगली सेवा द्यावी, अशी आमची भावना आहे.
महाराष्ट्र आणि मराठी माणसाठी एकत्र येत आहोत, हे त्यांचं सोंग आणि ढोंगं आहे. महापालिका निवडणुकांमुळे ते एकत्र येत आहेत. संभाजी महाराजांच्या मृत्यूपासून मावळ्यांनी महाराष्ट्राचं वैभव टिकवलं आहे. स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्यापासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्व नेतेमंडळींना महाराष्ट्राला जपले आहे. आम्ही मराठी माणसांसाठीच काम केल्यामुळेच एवढं प्रचंड बहुमत आम्हाला मराठी जनतेने दिले आहे, असा दावाही शहाजीबापूंनी केला.
ठाकरे बंधूंच्या भांडणामुळे बाळासाहेबांना आत्मक्लेष
पाटील म्हणाले, ठाकरे बंधूंनी पूर्वीच भांडण करायलं नको होते. त्यांच्या भांडणामुळे बाळासाहेब ठाकरे यांना आत्मक्लेष झाला. तो आता एकत्र येण्याने भरून निघणार नाही. घरातील भांडणाचं बाळासाहेब ठाकरेंना भोगावं लागलं. ते सध्या अस्तित्वात नसल्यामुळे तुम्ही एक झाला किंवा नाही तरी त्यांना काहीही फरक पडणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.