Shahajibapu on Rane Brtoher : राणे बंधूंच्या वादावर शहाजीबापू पाटलांचा मोठा दावा; म्हणाले ‘एकवेळ सूर्य खाली कोसळेल; पण....’

Rane Brtoher Dispute : राणे कुटुंबातील मी एक घटक असल्यासारखा आहे. त्या दोन भावांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. नीलेश राणे हे थोरले आहेत, त्यामुळे एखाद्या विधानावर त्यांनी नीतेश यांना सल्ला दिला असेल.
nitesh rane-nilesh Rane-Shahajibapu Patil
nitesh rane-nilesh Rane-Shahajibapu Patil
Published on: 
Updated on: 

Solapur, 09 June : कॅबिनेट मंत्री नीतेश राणे आणि शिवसेना आमदार नीलेश राणे यांच्यात सर्वांचा बाप मुख्यमंत्री म्हणून बसला आहे, या विधानावरून जोरदार वाक्‌युद्ध रंगले आहे. शिवसेना आमदार नीलेश राणेंनी मंत्री नीतेश राणेंना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे राणेंनी बंधूमध्ये शीतयुद्ध असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर आता शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मी राणे कुटंंबात वावरलो आहे. एकवेळ सूर्य खाली कोसळेल पण या दोघा भावांमध्ये वाद होणार नाही, असा दावा केला आहे.

मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी धाराशिवमधील एका कार्यक्रमात बोलताना सर्वांचा बाप मुख्यमंत्री म्हणून बसला आहे, असे विधान केले होते. त्याला शिवसेना आमदार आणि नीतेश यांचे बंधू नीलेश यांनी उत्तर देताना नीतेश यांनी जपून बोललं पाहिजं, आपण महायुतीमध्ये आहोत, याचे भान राखले पाहिजे, असा सल्ला दिला आहे. त्यालाही नीतेश यांनी नीलेश तुम्ही टॅक्स फ्री आहात, असे जोरदार उत्तर दिले आहे. त्यावर शहाजीबापू पाटील बोलत होते.

नीतेश राणे यांनी मुख्यमंत्री म्हणून सर्वांचा बाप बसला आहे, असे विधान केले होते. त्यावर शहाजीबापू म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे राम लक्ष्मण आणि भरत हे भावा भावासारखे आहेत. सर्वांचा बाप एकच आहे, तो म्हणजे महाराष्ट्राची जनता आहे, असा दावाही शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी केला.

nitesh rane-nilesh Rane-Shahajibapu Patil
Solapur NCP : धक्कादायक; राष्ट्रवादीच्या सरचिटणीसाची सोलापुरात आत्महत्या, हे कारण आले पुढे!

शहाजी पाटील म्हणाले, मंत्री नीतेश राणे यांचे विधान शिवसेना आमदार नीलेश राणेंनाही (Nilesh Rane) पटले नव्हतं. त्यांनीही नीतेश राणेंना सबुरीचा सल्ला दिला होता. तसेच, आपण कोणा बद्दल बोलतो, याचे भान ठेवण्याचा सल्ला दिला होता. यानिमित्ताने दोन भावांमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते.

nitesh rane-nilesh Rane-Shahajibapu Patil
Solapur Air Service : पंधरा वर्षांची प्रतीक्षा संपली....सोलापुरातून अखेर प्रवासी विमानसेवेचे ‘टेक ऑफ’

राणे बंधूंच्या मतभेदावर बोलताना त्याबाबत शहाजीबापू पाटील म्हणाले, एकवेळ सूर्य खाली कोसळेल. पण, नीलेश आणि नीतेश या दोन भावांमध्ये कोणताही वाद होणार नाही. राणे कुटुंबात मी वावरलो आहे, राणे कुटुंबातील मी एक घटक असल्यासारखा आहे. त्या दोन भावांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. नीलेश राणे हे थोरले आहेत, त्यामुळे एखाद्या विधानावर त्यांनी नीतेश यांना सल्ला दिला असेल, त्यामुळे नीतेश राणे यांनाही फार राग यायचे कारण नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.