Kolhapur Loksabha News : मंडलिकांची धडधड वाढली; 17 माजी महापौर, 228 माजी नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक प्रचाराला रंग चढू लागला असून सत्ताधारी आणि विरोधी आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
Shahu Maharaj
Shahu MaharajSarkarnama

Kolhapur News : लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडी, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपतींना कोल्हापूर शहरातील 17 माजी महापौर आणि 228 माजी नगरसेवकांनी पाठिंबा देत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. देशातील हुकुमशाही कारभार परतावून लावण्याची लढाई कोल्हापूरातून सुरू झाली पाहिजे, असा एल्गारही माजी नगरसेवकांच्या बैठकीत करण्यात आला.

न्यू पॅलेस येथे झालेल्या माजी नगरसेवकांच्या मेळाव्याला काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगांवकर, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, मालोजीराजे छत्रपती, काँग्रेसचे प्रदेश निरीक्षक रामचंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Shahu Maharaj
Ram Satpute Property : 'ऊसतोड कामगाराचा मुलगा' म्हणवून घेणाऱ्या आमदार राम सातपुतेंची संपत्ती किती?

लोकसभा निवडणूक प्रचाराला रंग चढू लागला असून सत्ताधारी आणि विरोधी आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीने 17 माजी महापौर आणि 228 माजी नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत सत्ताधारी महायुती आघाडीवर चांगलीच कुरघोडी केली आहे.

माजी नगरसेवकांच्यावतीने बोलताना माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, केंद्रातील भाजप (BJP) सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. इलेक्ट्रॉन बाँडमध्ये मोठा महाघोटाळा झाला आहे. एकीकडे जनतेचे महागाईने कंबरडे मोडले असून उद्योजकांच्या संपत्तीत वाढ होत चालली आहे. जाती, धर्मात भांडणे लावली जात आहेत. अशावेळी देश वाचवण्यासाठी सर्वांनी सिध्द झाले पाहिजे. देशातील हुकुमशाही कारभार परतावून लावण्याची लढाई कोल्हापूरातून झाली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील म्हणाले, ज्यावेळी जिल्ह्यात शहरात आणि जिल्ह्यात संकट आले त्यावेळी शाहू छत्रपती धाऊन आले आहेत. आज देशातील परिस्थिती पाहता जात पात, पक्षभेद विसरुन शाहूंची उमेदवारी ही जनतेच्या रेट्याखाली झाली असून त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

आमदार सतेज पाटील (Satej Patil) म्हणाले, लोकसभेची निवडणूक खिलाडूवृत्तीने व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू असताना विरोधकांकडून शाहू महाराजांचा सन्मान बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या वृत्तीला जनता चोख उत्तर देईल, असा इशारा दिला.

Shahu Maharaj
Loksabha Election 2024 : विखे, लंके, लोखंडे, वाकचौरे यांची बंडखोर अन् अपक्ष उमेदवार वाढवणार डोकेदुखी!

शाहू महाराज (Shahu Maharaj) म्हणाले, कोल्हापूरातील माजी महापौर आणि माजी नगरसेवकांनी मला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. यापुढे कोल्हापूरच्या विकासासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायचे असून कोल्हापूरच्या विकासातील कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य द्यायचे यासाठी नगरसेवकांचा सल्ला महत्वाचा ठरणार आहे. नगरसेवकांनी भरपूर कामे केली असून त्यातील एकादे काम राहिले असेल तर त्याचा पाठपुरावा केला जाईल.

(Edited By Deepak Kulkarni)

Shahu Maharaj
Loksabha Election : 'वय 84 सभा 84, नाद करायचा नाही', जितेंद्र आव्हाडांचा विरोधकांवर हल्ला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com