Shambhuraj Desai : शंभूराज देसाईंचे राष्ट्रवादीला नवीन वर्षात धक्केच धक्के !

Satyajit Patankar : पाटण विधानसभा मतदारसंघातील आठ गावातील कार्यकर्त्यांनी देसाई गटात प्रवेश
Satyajit Patankar, Shambhuraj Desai
Satyajit Patankar, Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदार संघात शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी पक्षीय लढत चिन्हावर पहायला मिळते. तर पारंपारिक गटतटाच्या राजकारणात शिवसेनेकडून शिंदे गटाचे नेते पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा गट तर विरोधात राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सत्यजित पाटणकर यांचा गट राजकारणात आमनेसामने पहायला मिळत आला आहे. या देसाई-पाटणकर गटाच्या राजकारणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देसाई गटाकडून नवीन वर्षात राजकीय धक्केच धक्के दिले जात आहेत.

पाटणचे राजकारणातील नेहमीच राज्यात चर्चेचा ठरत आलेला पहायला मिळत आला आहे. यापूर्वी 1995 ते 2009 या दरम्यान माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि सध्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई याच्यातील जय-पराजय हा केवळ शेकड्यात होत होते. परिणामी पाटण विधानसभा मतदारसंघात नेहमीच अटीतटीची लढत पहायला मिळत होती.

Satyajit Patankar, Shambhuraj Desai
Ranajagjitsinha Patil : कुस्तीच्या आखाड्यात राणा पाटलांचा काँग्रेसच्या चव्हाणांवर डाव ?

आता विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी 2014 साली 18 हजार 824 तर 2019 साली 14 हजार 175 अशा मोठ्या मतांनी विजय मिळवला. त्यामुळे कुठेतरी पाटणकर गटाला आत्मचिंतन करून पुन्हा मतदारसंघात बांधणी करणे गरजेचे आहे. अशावेळी 2024 या नव्या वर्षात मंत्री देसाई यांच्या गटाने पाटणकर गटाला धक्के दिले आहेत.  

नवीन वर्षात पाटण विधानसभा मतदारसंघातील जवळपास आठ गावातील कार्यकर्त्यांनी देसाई गटात पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेची (शिंदे गट) ताकद वाढताना दिसत आहे. चालू जानेवारी महिन्यात चव्हाणवाडी-नाटोशी, मुळगाव, निसरे, घाणव, बिबी या गावांनी मरळी-दौलतनगर येथे पक्षप्रवेश केला. तर मुंबईतील पावनगड निवासस्थानी येथे कारळे, शिरळ-काजारवाडी, धजगाव-धडामवाडी या गावातील ग्रामस्थांनी प्रवेश केला. नवीन वर्षात आणि निवडणुकीच्या वर्षात होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाच्या पाटणकर गटावर आत्मचिंतनांची वेळ आलेली आहे. 

Satyajit Patankar, Shambhuraj Desai
Honey Trap News : पोलिस मित्राने रचलेल्या 'हनी ट्रॅप'मध्ये अभियंता अडकला; अन्...

पाटणकर गट का फुटतोय ?

माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर (Vikramsingh Patankar) यांना गेल्या 45 वर्षांपासून साथ देणारे अनेक कार्यकर्ते आजच्या घडीला साथ सोडत आहेत. यामध्ये आजपर्यंत निष्ठावंत असणारे साथ का सोडत आहेत. यावर पाटणकर गट आत्मचिंतन करणार की जाणाऱ्यांना जावू देणार असा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सवाल उपस्थित केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यामध्ये मंत्री शंभूराज देसाई सत्तेचा, प्रशासनाचा वापर करून लोकांवर दबाव आणून पक्षप्रवेश करत असल्याचा आरोप केला जात आहे. तर देसाई गटाकडून विकासकामांसाठी अनेकजण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगत आहेत. यामधील कारण काहीही असले तरी पाटणकर गटाला दिली जाणारी सोडचिठ्ठी ही राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणणारी असल्याचे दिसत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Satyajit Patankar, Shambhuraj Desai
Farmer Suicide Attempt : भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com