Satara Politic's : रामराजेंच्या माणसासाठी शंभूराज देसाईंनी ताकद पणाला लावली; काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून घेतला मदतीचा शब्द

Shambhuraj Desai Meet Prithviraj Chavan : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र बडेकर यांनी उमेदवारी मागे घेत शिवसेनेच्या दीपक चव्हाण यांना पाठिंबा दिला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
Shambhuraj Desai Meet Prithviraj Chavan
Shambhuraj Desai Meet Prithviraj ChavanSarkar
Published on: 
Updated on: 

Satara, 24 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मातब्बरांनी माघार घेतल्याने अनेकांना जिल्हा बॅंकेवर काम करण्याची संधी मिळाली आहे. काँग्रेसचे कऱ्हाडमधील नेते रवींद्र बडेकर यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनूसूचित जाती-जमाती प्रवर्ग गटातून लढणाऱ्या आपला उमेदवारी अर्ज मागे घेत शिवसेनेचे उमेदवार, फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसार बडेकर यांनी शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिला आहे, शंभूराज देसाई यांनी आपले जुने नाते जपत चव्हाण यांच्यासाठी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी दोन्ही उमेदवारांचा सत्कारही करण्यात आला. त्यानंतर देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी बडेकर यांनी चव्हाण यांना पाठिंबा देण्यामागे पृथ्वीराज चव्हाण असल्याचे स्पष्ट केले.

मंत्री देसाई म्हणाले, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली असली, तरी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार रवींद्र बडेकर यांनी पॅनेलच्या अधिकृत उमेदवारास पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रवींद्र बडेकर, नामदेव पाटील, उमेदवार दीपक चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले.

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्या पॅनेलला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल नेते व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार, असे देसाई यांनी म्हटले आहे.

Shambhuraj Desai Meet Prithviraj Chavan
Maharashtra Politic's : राज्यातील 288 पैकी 155 आमदार ‘नॉन ग्रॅज्युएट’; शिक्षक, पदवीधर मतदारसंघासाठी केवळ 133 आमदारांचे मतदान

दरम्यान, सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. या दोन्ही जागा जिंकण्यासाठी पालकमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यानुसार त्यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून काँग्रेस उमेदवाराचा पाठिंबा मिळविण्यात यश मिळविले आहे.

Shambhuraj Desai Meet Prithviraj Chavan
Solapur Dcc Bank : सचिन कल्याणशेट्टींनी वाढविले रणजितसिंह मोहिते पाटलांचे टेन्शन; सलग तीन टर्म जिंकलेल्या मतदारसंघाच्या विजयाची चावी भाजप आमदाराच्या हाती

पृथ्वीराज चव्हाण आणि देसाई हे पूर्वी काँग्रेस पक्षात एकत्र होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये जुने ऋणानुबंध आहेत. ते वापरून शंभूराज देसाई यांनी बँकेच्या अनूसूचित जाती- जमाती प्रवर्ग गटातून लढणारे फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या पाठीशी पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून काँग्रेसची ताकद उभी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

jaykumar gore-ranjitsinh naik nimbalkar
Satara DCC Bank Election Update
Anil Desai and Rajendra Rajpure
Satyajeet Patankar-Shambhuraj Desai
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com