Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर आत्महत्येप्रकरणी शिवसेनेच्या जबाबदार पदाधिकाऱ्याचे मोठे विधान; ‘तपास शांत; पण चुकीच्या...’

Solapur Crime News : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या निकटवर्तीयाने या आत्महत्येप्रकरणी गृहकलह असल्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. त्यामुळे वळसंगकर कुटुंबीयांत गृहकलह होता, हे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे वळसंगकर कुटुंबीयांच्या जवळ असलेले मनीषा मुसळे माने हिनेही तसेच म्हणणे जबाबात नोंदविले आहे.
Dr. Shirish Valsangkar
Dr. Shirish ValsangkarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 09 May : प्रख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंंगकर यांच्या आत्महत्येला वीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. मात्र, पोलिस अजूनही ठोस निष्कर्ष आणि आरोपीपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. डॉक्टरांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारावर वळसंगकर हॉस्पिटलमधील मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्यापुढे तपास पोचू शकलेला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या एका जबाबदारी पदाधिकाऱ्याने तपास चुकीचे पद्धतीने होत आहे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षापाठोपाठ शिवसेनेने डॉक्टरांच्या आत्महत्याप्रकरणात उडी घेतली आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar ) यांनी १८ एप्रिल रोजी राहत्या घरी आत्महत्या केली हेाती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आली होती. मात्र, मुसळे माने हिने दिलेल्या जबाबातून वळसंगकर यांच्या घरात कलह होता, हे दिसून येत आहे.

पोलिस अधिकारी (Police Officer) मात्र मनीषा मुसळे माने हिच्यापुढे जायला तयार नाहीत. त्यातूनच हाती काही ठोस नसल्यामुळे पोलिसांना मागच्या वेळी न्यायालयीने कोठडी मागावी लागली होती. आताही मनीषा मुसळे माने हिची न्यायालयीन कोठडी संपली तरी ठोस पुरावा पोलिसांना सापडलेला नाही. सापडला असला तरी पोलिसांनी ते अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात नवनवीन गोष्टी दररोज उजेडात येत आहेत.

Dr. Shirish Valsangkar
Dr Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकरांनी ‘तो’ मोठा निर्णय घेऊनच उचलले आत्महत्येचे पाऊल; गृहकलहावर जवळच्या व्यक्तीचे प्रथमच भाष्य

दरम्यान, डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडे सोपविण्यात यावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाला दुसरी बाजूसुद्धा आहे, त्यामुळे त्याही बाजूने तपास व्हावा, अशी मागणी काही जणांकडून करण्यात आली आहे.

डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणात आता राजकीय नेत्यांनीही उडी घेतली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाचा तपास शांत आणि चुकीचे पद्धतीने करण्यात येत आहे, असा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची ‘एसआयटी’च्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी. तसेच, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Dr. Shirish Valsangkar
War Tensions : घाबरू नका! भारताकडे पेट्रोल, गॅसचा मुबलक साठा, युद्धजन्य परिस्थितीमध्ये अफवांपासून लांब रहा

मनीषा मुसळे मानेचे गृहकलहाच्या दिशेने अंगुलीनिर्देश

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या निकटवर्तीयाने या आत्महत्येप्रकरणी गृहकलह असल्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. त्यामुळे वळसंगकर कुटुंबीयांत गृहकलह होता, हे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे वळसंगकर कुटुंबीयांच्या जवळ असलेले मनीषा मुसळे माने हिनेही तसेच म्हणणे जबाबात नोंदविले आहे. डॉ. शिरीष, डॉ शोनाली आणि डॉ. अश्विन यांच्यामध्ये वादविवाद होत असत. बिल कमी करण्यावरून डॉ शिरीष आणि डॉ शोनाली यांच्यात बरेचदा खटके उडायचे, असेही मुसळे माने हिने पोलिसांनी सांगितले आहे. पण पोलिसांनी अजूनही गृहकलहाच्या दिशेने तपास केला आहे किंवा नाही, याबाबत स्पष्टता नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com