Gokul News : ‘गोकुळ’च्या वादावर मंत्री प्रकाश आबिटकरांचं मोठं भाष्य : ‘एकतर प्रशासक किंवा फेरनिवडणुका...’

Kolhapur Political News : गोकुळच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या पेचावर प्रकाश आबिटकर यांनी भाष्य केले. तोडगा न निघाल्यास प्रशासक किंवा फेरनिवडणुकीची शक्यता असून तज्ज्ञ संचालकाचा पर्यायही चर्चेत आहे.
Prakash Abitkar
Prakash Abitkar Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 05 November : गोकुळच्या अध्यक्षपदाबाबत सध्या कोल्हापुरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात उत्सुकता लागून राहिली आहे. अध्यक्ष महाविकास आघाडीचा होणार की महायुतीचा याची प्रतिक्षा असतानाच शिवसेना नेते तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गोकुळबाबत मोठं भाष्य केलं आहे. गोकुळमध्ये पहिल्यांदाच असं घडलं आहे की, महाआघाडी बैठक घेऊ शकत नाही, तर आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही. अशा परिस्थितीत मार्ग न काढल्यास गोकुळवर प्रशासक येऊ शकतो किंवा पुन्हा निवडणूक होऊ शकते, त्यामुळे सरकारने मार्ग काढण्यासाठी तज्ज्ञ संचालकाचा पर्याय पुढे आणला आहे, असे आबिटकर यांनी म्हटले आहे.

जनआरोग्य संवाद यात्रेच्या निमित्ताने आरोग्य मंत्री आबिटकर हे सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले, गोकुळमध्ये महाविकास आघाडीचे 13, तर महायुतीचे 12 संचालक निवडून आले आहेत. ज्या पद्धतीने गोकुळच्या बायलॉज आहेत, त्यापद्धतीने सभा घेण्यासाठी 14 संचालकांचा कोरम असण्याची गरज आहे. महाराष्ट्रमध्ये पहिल्यांदाच अशी स्थिती आहे की, त्यांच्याकडे 13 संचालक असूनही ते बैठक घेऊ शकत नाही आणि आमच्याकडे 12 असूनही आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही.

साहजिकच यामध्ये काही तरी मार्ग काढला पाहिजे; म्हणून सरकारने मध्यस्थी केली; अन्यथा गोकुळवर प्रशासक येईल. प्रशासक येण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये 5 संचालक शासन नियुक्त होतील, त्यांना कोणाला निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उभं राहता येणार नाही. 25 लोकांनी योग्य पद्धतीने काम करण्यासाठी हे तज्ज्ञ संचालक मदत करतील. प्रशासक येईल किंवा पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल, असे आबिटकर यांनी म्हटले आहे.

Prakash Abitkar
Solapur Dcc Bank : मोहिते पाटील, परिचारक, माने, म्हेत्रे, शिंदे, आवताडे, हसापुरे यांचे कारवाईला चॅलेंज; अर्ज अवैधतेविरोधात सहनिबंधकांकडे धाव

महाआघाडीकडे 13 संचालक आहेत. हे मान्य पण बैठक घेता येणार नाही. ते आम्हाला आवाहन करत आहेत की, तुम्ही सोबत या. पण, आम्ही तुमच्याविरोधात निवडून आलो आहोत. यामध्ये रडीचा डाव कुठून आला? शिवाय गोकुळच्या साडेपाच लाख सभासदांचे हित बघण्याचा मक्ता फक्त त्यांच्याकडे दिलेला नाही, आमच्याकडेसुद्धा तज्ज्ञ लोक आहेत. जर आताची परिस्थिती बघितली तर कॅबिनेटने घेतलेला निर्णय हा संयुक्तिक ठरेल, असेही आबिटकर यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.