Rajesh Kshirsagar : पाच वेळा मंत्रीपद मागणाऱ्या आमदारांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री हसले, क्षीरसागरांच्या मागणीबाबत आबिटकरांचा खुलासा

Prakash Abitkar Reaction On Rajesh Kshirsagar Ministerial Demand : महायुती सरकार सत्तेत आल्यापासून आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रीपदाची आस लागून राहिली आहे. त्यांच्या मंत्री पदाबाबत आता बॅनर देखील लागत असून यावरून जिल्ह्यात चर्चा होताना दिसत आहे.
Rajesh Kshirsagar Ministerial Demand; Prakash Abitkar
Rajesh Kshirsagar Ministerial Demand; Prakash AbitkarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur Political News : महायुती सरकार सत्तेत आल्यापासून आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रीपदाची आस लागून राहिली आहे. सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत आमदार क्षीरसागर यांनी मंत्रीपद मिळावे यासाठी तब्बल पाच वेळा आपली इच्छा बोलून दाखवली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपली इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. मात्र, त्यावर शिवसेनेचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रश्नावर मोठ्याने हसून पुढील प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार राजेश क्षीरसागर हे जिल्ह्याचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या अनेक कामांत आम्ही मदत करत असतो. मंत्रीपदाबाबत ते ज्या भूमिका मांडत आहेत, त्या योग्य असल्याचा खुलासा मंत्री आबिटकर यांनी केला.

राज्याच्या समन्वय समितीमध्ये जिल्हा नियोजनमधील निधीवाटपाचा ७०-३० असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसारच जिल्हा परिषदेच्या सदस्यांना निधी दिला जाणार आहे. मात्र, जिल्ह्यासाठी वेगळा निर्णय घेऊन दोन दिवसांत तसा प्रस्ताव महायुतीच्या सदस्यांसमोर दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

Rajesh Kshirsagar Ministerial Demand; Prakash Abitkar
Rajesh Kshirsagar: शिंदेंच्या आमदाराचे माजी खासदाराबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, शेतकरी संघटनेनं झाडाला टांगून पुतळा जाळला

पालकमंत्री आबिटकर म्हणाले, ‘‘जिल्हा नियोजनमधील जिल्हा परिषद सदस्यांना वाटप केल्या जाणाऱ्या निधीचा फॉर्म्युला राज्यात ठरला आहे. आमदार-खासदारांना ७० टक्के आणि जिल्हा परिषद सदस्यांना ३० टक्के निधी वाटप केला जाणार आहे.

Rajesh Kshirsagar Ministerial Demand; Prakash Abitkar
Rajesh Kshirsagar : गैरव्यवहार प्रकरणात शिंदेंचा शिलेदार अडचणीत! क्षीरसागर यांच्याविरोधात विधानसभेत स्थगन प्रस्ताव अन् उच्च न्यायालयात...

त्यानुसार इतर जिल्ह्यांतही निधी दिला जात आहे. मात्र, जिल्ह्यासाठी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळा निर्णय घेतला जाईल. त्यासाठी वेगळा प्रस्ताव तयार करून महायुतीच्या सदस्यांसमोर दोन दिवसांत दिला जाईल. तो प्रस्ताव निश्चितपणे आपल्याला मान्य होईल, यात शंका नाही.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.