Rajesh Kshirsagar : गैरव्यवहार प्रकरणात शिंदेंचा शिलेदार अडचणीत! क्षीरसागर यांच्याविरोधात विधानसभेत स्थगन प्रस्ताव अन् उच्च न्यायालयात...

MVA Leader On Rajesh Kshirsagar Sting Operation : ठेकेदारांशी 40 लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून तशी रणनीती महाविकास आघाडीच्यावतीने आखण्यात आली आहे.
Shivsena MLA Rajesh Kshirsagar
Shivsena MLA Rajesh Kshirsagarsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शिवसेनेचे नेते आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवीकिरण इंगवले यांनी व्हिडिओ बॉम्ब टाकत गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे कोल्हापूरसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून आमदार क्षीरसागर यांच्यावर ठेकेदारांशी 40 लाखाच्या गैरव्यवहाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तर यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांचा या प्रकरणात हात असल्याचा दावा आमदार क्षीरसागर यांनी केला आहे.

यावरून आता महाविकास आघाडीच्यावतीने पत्रकार परीषद घेत जोरदार पलटवार केला आहे. तसेच याप्रकरणी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात सोमवारी (ता. 28) विधिमंडळात स्थगन प्रस्ताव सादर करण्यासह उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे आघाडीच्यावतीने सांगण्यात आले आहे. यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आता अडचणीत येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

शिवसेनेचे आमदार क्षीरसागर यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोल्हापुरात खळबळ उडाली असून क्षीरसागर यांनी (रविवारी) पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी मी पाठीत वार करणारा माणूस नाही आणि सतेज पाटलांनीही आता पाठीत वार करणे बंद करावे. सतेज पाटील यांनी माझ्यावर निरर्थक आणि बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा, त्यांनी स्वतः इतकी वर्षे महापालिकेत सत्ता आणि पालकमंत्री पद भोगताना कोल्हापूरच्या जनतेसाठी काय दिवे लावले, याचे विश्लेषण करावे.

Shivsena MLA Rajesh Kshirsagar
Rajesh Kshirsagar : व्हायरल व्हिडिओवर आमदार क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण; सतेज पाटलांवर गंभीर आरोप करत म्हणाले, "व्हॉईस डबिंग अन् जाणीवपूर्वक..."

तर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या ऐन प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हा एडिटेड व्हिडीओ व्हायरल करून पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती. तर आता सतेज पाटलांचे राजकीय अस्तित्व संपत आल्यामुळे आणि महापालिका निवडणुकीतील मानहानीकारक पराभवामुळेच ते माझ्याविरोधात बदनामीचे छुपे षडयंत्र रचत आहेत," असा घणाघाती आरोप क्षीरसागर यांनी केला होता.

यानंतर आता या प्रकरणात महाविकास आघाडीने उडी घेतली असून क्षीरसागर यांचा व्हायरल होणार हा व्हिडिओ कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह बांधकाम व्यवहाराशी संबंधित असल्याचा करण्यात आला आहे. काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील मोदी यांनी हा दावा केलाय. त्यांनी आमदार क्षीरसागर यांनी थेट चौकशीसाठी सामोरे यावे. या प्रकरणाशी आमदार सतेज पाटील यांचा काहीही संबंध नसताना त्यांची बादनामी करू नये. मूळ मुद्दा भरकटू न देता याबाबतच्या चौकशीला सामोरे जावे, असे आव्हान दिले आहे.

तसेच लाटकर यांनी क्षीरसागर यांच्यावर टीकेचा मारा करत, केशवराव भोसले नाट्यगृह ही कोल्हापूरकरांची अस्मिता असून ते कोल्हापुरचे सांस्कृतिक वैभव आहे. या 25 कोटीच्या कामातच आता टक्केवारीतून पैसे मिळवण्याचा उद्योग सुरू झाला आहे. याच उद्योगात क्षीरसागर यांचा सहभाग असल्याचे आता समोर येत आहे. तर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून समोर येणाऱ्या संवादातून हेच दिसून येत आहे. यामुळे या प्रकरणात सोमवारी (ता.29) पोलीस महासंचालकांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचेही लाटकर यांनी म्हटलं आहे.

Shivsena MLA Rajesh Kshirsagar
Rajesh Kshirsagar: पाच टक्क्यांप्रमाणे 40 लाख दिले! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांने शिंदेच्या आमदाराचे स्टिंग ऑपरेशन करत केला भंडाफोड

याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील मोदी यांनी देखील कथित गैरव्यवहाराची वस्तुस्थिती विरोधकांकडून पुढे आणली जाईल असा इशारा दिला आहे. त्यांनी, व्हिडिओत दिसणाऱ्या कंत्रालदारावर राजकीय आणि गुंडांकरवी दबाव आणला जात आहे. यामुळे त्याने सध्या मुंबई सोडली असून या प्रकरणाचा पाठपुरावा त्याच्याकडून सुरू राहणार आहे. तसेच असे आणखी काही व्हिडिओ असून ते लवकरच समोर येतील, असा दावा देखील त्यांनी सुनील मोदी यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com