Rajesh Kshirsagar: शिंदेंच्या आमदाराचे माजी खासदाराबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, शेतकरी संघटनेनं झाडाला टांगून पुतळा जाळला

Shaktipeeth Highway Controversy : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गावरून जिल्ह्यातील माजी खासदार विरूद्ध विद्यमान आमदार असा संघर्ष सुरू झाला आहे.
Eknath Shinde, Rajesh Kshirsagar
Eknath Shinde, Rajesh KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याविरोधात आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली-कर्नाळ रस्त्यावरील राजपूत गार्डन परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निषेधार्थ त्यांचा प्रतीकात्मक पुतळा झाडाला टांगून, त्यानंतर पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर या वक्तव्याने संतप्त झालेल्या शेट्टी यांनी देखील क्षीरसागरांना खुले आव्हान देत ’दम असेल तर टांगून दाखवाच, असा पलटवार केला आहे.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह व संतापजनक भाषेत टीका केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. राजू शेट्टी यांना “राक्षस” संबोधून त्यांना उलटे टांगण्यात येईल, अशा आशयाचे वक्तव्य करण्यात आल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. लोकप्रतिनिधीने अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी असून, राजकीय मतभेद असले तरी व्यक्तीविरोधात अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

याच वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांचा प्रतीकात्मक पुतळा झाडाला टांगला. त्यानंतर पुतळ्याचे दहन करून संघटनेच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार क्षीरसागर यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Eknath Shinde, Rajesh Kshirsagar
Rajesh Kshirsagar : गैरव्यवहार प्रकरणात शिंदेंचा शिलेदार अडचणीत! क्षीरसागर यांच्याविरोधात विधानसभेत स्थगन प्रस्ताव अन् उच्च न्यायालयात...

यावेळी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी सांगितले की, राजू शेट्टी यांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला आहे. अशा नेतृत्वाबाबत अपमानास्पद व धमकीवजा भाषा वापरणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कदापि सहन करणार नाहीत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा करून माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा संघटनेच्या वतीने पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Eknath Shinde, Rajesh Kshirsagar
Rajesh Kshirsagar : व्हायरल व्हिडिओवर आमदार क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण; सतेज पाटलांवर गंभीर आरोप करत म्हणाले, "व्हॉईस डबिंग अन् जाणीवपूर्वक..."

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांच्या अध्यक्षतेखाली सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय बेले, विश्वास कोळी, मनोहर पाटील, अजित लांडे, दीपक फराटे, चंद्रकांत अडसूळ, मयूर पाटील, नटराज पाटील, शरद पाटील, श्रीधर पाटील, अवधूत पाटील, संतोष ढोले, विनोद बेले व शेतकरी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com