Education Department : मोठी बातमी: SIRच्या कामातील हलगर्जीपणा पडला महागात; शिक्षण विभागातील चौघांवर अखेर गुन्हा दाखल!

SIR work negligence latest updates : एसआयआर कामात झालेल्या कथित हलगर्जीपणाप्रकरणी शिक्षण विभागातील चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संपूर्ण घडामोडी जाणून घ्या.
 Maharashtra Education Department
Maharashtra Education Department Sarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून एसआयआर प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बीएलओची नियुक्ती यादी दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी शिक्षण विभागासह अन्य विभागातील कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून वारंवार विनंती करून उपस्थित न राहणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. मतदार यादी सखोल पुनरिक्षण (एआयआर) कार्यक्रमाची जबाबदारी असताना गैरहजर राहणाऱ्या चौघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

 Maharashtra Education Department
Maharashtra Bandh : महाराष्ट्रात आज बंदची हाक! राज्यात काय सुरू अन् काय बंद? जाणून घ्या 'A to Z' माहिती

जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे वरिष्ठ सहायक संजय रणदिवे, ग्रामीण पाणीपुरवठा कनिष्ठ सहायक सुशांत धोंडिराम सूर्यवंशी, शिक्षण विभागाचे शिपाई सुनील मिसाळ, राजू रामचंद्र वडर अशी त्यांची नावे आहेत. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली आहे.

उत्तर विधानसभा मतदारसंघातील (२७६) मतदार याद्यांचे निरीक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या १४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती २५ जूनला केली होती. यातील संजय रणदिवे, सुशांत सूर्यवंशी, सुनील मिसाळ, राजू वडर हे वारंवार गैरहजर राहिले. नोटीस बजावूनही २१ जुलैअखेर ते गैरहजर राहिल्यामुळे महसूल सहायक राजेंद्र माळी यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

 Maharashtra Education Department
Tukaram Mundhe FDA Raid: ताकात माशी, भजीत प्लास्टिक! तुकाराम मुंढेंच्या FDA ने BMCचे कॅन्टीन केले सील

गुन्हा दाखल होताच विनवणी नोटीस मिळाल्यानंतरही चौघांनी प्रतिसाद दिली नव्हता. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत आल्याने पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनीही चौघांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्याकडून प्रतिक्रिया न आल्याने अखेर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच चौघेही पोलिसांकडे विनवणी करत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com