Krishnaraj Mahadik Tour : कृष्णराज महाडिकांच्या पहिल्याच दौऱ्याला बेशिस्तीचे गालबोट; विठ्ठल मंदिरात धक्काबुक्की अन॒ घोषणाबाजी

Yuvashakti Jagar Yatra Pandharpur : पंढरपुरातील विठ्ठल मंदिर दर्शनावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या धक्काबुक्की आणि घोषणाबाजीमुळे कृष्णराज महाडिक यांच्या दौऱ्यावर वादाचे सावट निर्माण झाले आहे.
Krishnaraj Mahadik
Krishnaraj MahadikSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 19 May : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक हे सोलापूरमधील पक्षाचा कार्यक्रम उरकून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. अधिक मासामुळे मंदिरात अगोदरच मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यातच महाडिक यांच्यासोबत आलेल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंदिर प्रवेशासाठी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी केली. त्यामुळे महाडिकांच्या पहिल्याच युवाशक्ती जागर यात्रेच्या दौऱ्याला कार्यकर्त्यांच्या बेशिस्त वर्तनाचे गालबोट लागले आहे.

भाजप युवा मोर्चाचा रविवारी (ता. १७ मे) प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. त्यानंतर त्यांनी सोमवारी बार्शी आणि सोलापूर ग्रामीण, शहरी भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सोलापुरातील पक्षाचे कार्यक्रम संपवून कृष्णराज महाडिक हे सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पंढरपुरात येणार होते. मात्र, ते रात्री दहा वाजता पंढरपूर शहरात दाखल झाले.

युवाशक्ती जागर यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात आलेल्या भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे भाजप कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. स्वागतानंतर कृष्णराज महाडिक हे थेट विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंदिरात गेले होते. त्यांच्यासोबत व्हीआयपी दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उत्तर द्वारासमोर गर्दी केली होती.

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी पाहून विठ्ठल मंदिर समितीकडून कृष्णराज महाडिक यांच्यासह अगदी मोजक्या लोकांनाच मंदिरामध्ये सोडण्यात आले. इतरांना गेटवरच अडविण्यात आले, त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी मंदिरात न सोडल्याने धक्काबुक्की करत घोषणाबाजी केली.

Krishnaraj Mahadik
Krishna Sugar Factory : भोसले अन्‌ मोहितेंची ॲड. उदयसिंह उंडाळकरांना ऑफर; उंडाळकर गटाची ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका

कार्यकर्त्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे पहिल्यांदाच पंढरपुरात आलेल्या कृष्णराज महाडीक यांच्या दौऱ्याला गालबोट लागले आहे. भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षांपुढेच भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या गैरवर्तनामुळे युवाशक्ती जागर यात्रेपेक्षा भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या धक्काबुक्कीचीच चर्चा अधिक रंगली होती.

Krishnaraj Mahadik
Shriram Sugar Factory : आवाडेंनी सोडलेला श्रीराम कारखाना रामराजे गटाने श्री दत्त इंडियाला चालवायला दिला

भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यासोबत आलेल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वर्तनाचा भाविकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली, त्यामुळे महाडिकांचा पंढरपूर दौरा प्रकर्षाने चर्चेत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com