MP Politics : "300 कोटी मिळाले तरच..!" आमदाराच्या वक्तव्याने काँग्रेस अडचणीत, भाजपचंही टेन्शन वाढलं; दोन्ही पक्षातील राजकीय वातावरण तापलं

Congress MLA Nirmala Sapre Politics : मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून महिला काँग्रेस आमदाराच्या एका वक्तव्याने दोन्ही पक्षातील राजकीय वातावरण तापलं आहे.
Madhya Pradesh Bina Congress MLA Nirmala Sapre Politics
Madhya Pradesh Bina Congress MLA Nirmala Sapre Politicssarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. मध्य प्रदेशातील बीना मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार निर्मला सप्रे यांच्या वक्तव्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

  2. “300 कोटी रुपये दिले तर पाठिंबा देईन” या विधानामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

  3. बीना विभागाला जिल्ह्याचा दर्जा देणाऱ्या पक्षालाच समर्थन देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Madhya Pradesh Bina Congress MLA Political News : मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली असून याला काँग्रेसच्या महिला आमदाराचे वक्तव्य कारणीभूत ठरले आहे. येथील सागर जिल्ह्यातील बीना विधानसभा मतदारसंघाच्या आमदार निर्मला सप्रे यांच्या विधानामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली असून भाजपचंही टेन्शन वाढलं आहे.

निर्मला सप्रे यांनी, " आपल्याला जो पक्ष 300 कोटी रुपये आणि बीना विभागाला जिल्हा बनवेल त्याला मी पाठिंबा देईल", असंही म्हटलं आहे. आता निर्मला सप्रे यांच्या या विधानामुळे दोन्ही पक्षातील राजकीय वातावरण तापलं आहे. तर निर्मला सप्रे यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा अनेक घडामोडींनी डोकं वर काढलं असून एकाच वेळी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. याला कारणीभूत आमदार सप्रे यांचे विधान आता ठरले आहे.

Madhya Pradesh Bina Congress MLA Nirmala Sapre Politics
Congress Politics : पुणे काँग्रेसला आठवड्याभरात मिळणार दोन कारभारी ! 'या' दोन नेत्यांच्या नावाची चर्चा

त्यांचे "300 कोटींच्या.." वक्तव्यावरून येथील राजकीय वातावरण आता गरम झाले असून भविष्यातील राजकीय हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे. तसेच दोन्ही पक्षातील आमदारांची नाराजी, दबावाचं राजकारणही उघड होत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

भाजपमध्ये जाणार...

निर्मला सप्ने यांनी विधानसभा निवडणूकही काँग्रेसच्या तिकीटावर लढविली आणि जिंकलीही. पण आता त्या अनेकदा भाजप नेत्यांसोबत कार्यक्रमांमध्ये दिसत आहेत. यामुळेच मध्य प्रदेशच्या राजकारणात त्या भाजपबरोबर जातील अशा राजकीय वर्तुळात चर्चा रंगील आहे. पण अद्याप निर्मला सप्ने यांनी याबाबत कोणतीच औपचारिक घोषणा केलेली नाही. सध्या निर्मला सप्रे यांच्याविरोधात जबलपूर हायकोर्टात पक्षांतर कायद्यानुसार याचिकाही दाखल केली आहे.

निर्मला सप्रे यांच्याविरोधात जबलपूर हायकोर्टात पक्षांतर कायद्यानुसार याचिका दाखल असून त्यात त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्या काँग्रेसकडून निवडून आल्या असतानाही पक्षाशी फारकत घेत भाजपचं समर्थन केलं आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अशातच आता पुन्हा एकदा त्यांनी बीना विभागाला जिल्हा बनवण्याच्या जुन्या मागणीला हवा देत थेट "300 कोटींचे.." विधान केलं आहे.

Madhya Pradesh Bina Congress MLA Nirmala Sapre Politics
Kerala Congress Politics : मुख्यमंत्रिपदाच्या रेसमधील काँग्रेस नेता PM मोदींचं नाव घेऊन फसला; केरळमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर...

FAQs :

1. निर्मला सप्रे कोण आहेत?

निर्मला सप्रे या मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील बीना विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार आहेत.

2. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद का निर्माण झाला?

त्यांनी “300 कोटी रुपये दिले तर पाठिंबा देईन” असे विधान केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

3. उमंग सिंघार कोण आहेत?

उमंग सिंघार हे मध्य प्रदेश काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते आहेत.

4. निर्मला सप्रेंची मुख्य मागणी काय आहे?

बीना विभागाला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची त्यांची मागणी आहे.

5. या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया काय आहेत?

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com