Solapur NCP : अजितदादांनी पालकत्व स्वीकारलेल्या सोलापूरची राष्ट्रवादी आठ महिन्यांपासून ‘कॅप्टन’च्या प्रतीक्षेत

Local Body Election 2025 : निवडणुकीच्या दृष्टीने ना शहरातील कार्यकरिणी काम करत आहे ना जिल्ह्याची. उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षसंघटनेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 June : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. मात्र, सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्यापही शांतता दिसून येत आहे. निवडणुकीच्या दृष्टीने ना शहरातील कार्यकरिणी काम करत आहे ना जिल्ह्याची. उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षसंघटनेच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. मात्र, अजितदादांनी अद्याप सोलापूरचा दौरा केलेला नाही. विधानसभा निवडणुकीपासून सोलापूरची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या प्रतीक्षेत आहे. आगामी निवडणुकीसाठी तरी राष्ट्रवादीला जिल्हाध्यक्ष मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजीनामा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता, तेव्हापासून सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे (Solapur NCP) जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे. मात्र, अजूनही नव्या नियुक्त्या पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. जिल्हाध्यक्षच नसल्यामुळे तालुकाध्यक्ष आणि जिल्हा, तसेच तालुका कार्यकारिणीही अस्तित्वात नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे, त्यातच सत्ताधारी असलेल्या भाजपकडून जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नियुक्त्या गेल्या आठवड्यातच जाहीर केल्या आहेत. महायुतीमधील शिवसेनेकडून ‘इनकमिंग’वर जोर देत निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आल्याचे दिसत आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र निवडणुकीच्या कामाबाबत उदासीनता दिसून येत आहे.

दीपक साळुंखे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला नवा जिल्हाध्यक्ष मिळू शकलेला नाही. मध्यंतरी काही लोकांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली तसेच, पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंगही लावली होती. तेच ते चेहरे आणि नावे समोर येत असल्याने पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी काही नावावर फुली मारल्याची चर्चा आहे. आता पक्षाचे प्रमुखांकडून काय भूमिका घेतली जाते, हे पाहावे लागणार आहे.

Ajit Pawar
BJP Election Strategy : भाजप इलेक्शन मोडवर; अवघ्या आठ दिवसांत पाच मंत्री सोलापूर दौऱ्यावर!

आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. इतर राजकीय पक्ष हे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, सोलापूरचे पालकत्व स्वीकारलेले अजितदादा मात्र अजूनही जिल्ह्यात आलेले नाहीत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणाच्या नेतृत्वात लढणार. पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना मतपेटीपर्यंत आणण्यासाठीचे प्रयत्न कोण करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

Ajit Pawar
Sangli Politic's : 3 माजी आमदारांसह मातब्बर नेत्यांनी धुडकावला जयंतरावांचा निरोप; राष्ट्रवादीतील प्रवेश रोखण्याचा डाव फसला

जिल्हाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे माजी आमदार राजन पाटील, संजय शिंदे, कल्याणराव काळे, दादासाहेब साठे, शहरात संतोष पवार असे नेते आहेत. यातील काहींनी जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, जिल्हाध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाला पसंती देतात याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com