Jaykumar Gore : सुभाषबापू, काळजी करू नका; मी कोणाकडेही जेवायला गेलो, तरी काम भाजपचेच करणार : गोरेंचे 'त्या' चर्चेवर स्पष्टीकरण

Dilip Mane's House Visit : भाजपचा कार्यकर्ता ही माझी सगळ्यात मोठी प्रयोरिटी राहील. कोणी कितीही जवळ बसला आणि जेवायला बसला तरी काम अगोदर भाजपच्या कार्यकर्त्यांचंच होईल
Subhash Deshmukh-Jaykumar Gore-Dilip Mane
Subhash Deshmukh-Jaykumar Gore-Dilip Mane Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 03 April : कोणी कितीही जवळ बसला आणि मी कोणाकडे जेवायला बसलाे, तरी काम अगोदर भाजपच्या कार्यकर्त्याचंच होईल. बापू (माजी मंत्री सुभाष देशमुख) मी सोलापूर जिल्ह्यात व्यक्तिगत राजकारण करायला आलो नाही, आपण माझ्यापेक्षा पक्षात आणि संघटनेत खूप ज्येष्ठ आहात. कोणीही चिंता करू नका, मी पक्षासाठीच काम करणार आहे. तुमचा वकील म्हणून काम करेन आणि तुमचा वकील हा मजबूत आहे, अशा शब्दांत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्याकडील स्नेहभोजनावरून सुरू असलेल्या चर्चेवर स्पष्टीकरण दिले.

पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे बुधवारपासून (ता. ०२ एप्रिल) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गोरे हे बुधवारी अक्कलकोटच्या दौऱ्यावर होते, त्या ठिकाणी त्यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या घरी भेट दिली. पालकमंत्री आज सकाळपासून गाठीभेटी घेत होते, त्यात माजी आमदार माने यांनी सकाळीच विश्रामगृहावर येऊन गोरे यांची भेट घेत बंद खोलीत चर्चा केली होती. तसेच, दुपारी त्यांनी माने यांच्याकडे स्नेहभोजनही घेतले. त्यावरून सुरू असलेल्या चर्चेवर गोरे यांनी भाष्य केले.

पालकमंत्री गोरे म्हणाले, ज्यांना झोपायला वेळ मिळाला, ते झोपलेले आहेत आणि ज्यांना काम करायला मिळालं ते आज काम करत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात सलग 15 वर्षे भाजपची सत्ता आली. भाजप (BJP) हा बहुमतातला पक्ष असताना सुद्धा युतीधर्म म्हणून आपण सर्वांना सामावून घेतलं आहे. ज्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत, असा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आज काम करत आहे.

जयकुमार गोरे म्हणाले, राज्यात आज भाजपचे सरकार आहे, ज्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली, त्या कार्यकर्त्यांशिवाय ना मी मंत्री झालो असतो, ना पालकमंत्री झालो असतो. दुर्दैवाने काही घटना झाल्या आणि पालकमंत्री म्हणून तुम्हाला भेटायला उशीर झाला. भाजपचा कार्यकर्ता ही माझी सगळ्यात मोठी प्रयोरिटी राहील. कोणी कितीही जवळ बसला आणि जेवायला बसला तरी काम अगोदर भाजपच्या कार्यकर्त्यांचंच होईल (काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी सकाळी पालकमंत्री गोरे यांची भेट घेतली असून त्यांच्या घरी दुपारी स्नेहभोजनही घेतले आहे)

Subhash Deshmukh-Jaykumar Gore-Dilip Mane
Karad politic's : माजी मंत्री बाळासाहेब पाटलांचा भाजप आमदारांवर गंभीर आरोप;‘विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरची ‘ती’ घटना सांगितली!

महिन्यातून दोन दिवस मी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी पक्ष कार्यालयात बसणार आहे. तिथं बसून मी कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन. पक्षाने दिलेलं उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय मी पुढे जाणार नाही.आता सरकार आपलं आलं आहे. साऱ्या कार्यकर्त्यांच्या पक्षाकडून अपेक्षा आहेत.

बापू मी सोलापूर जिल्ह्यात व्यक्तिगत राजकारण करायला आलो नाही, आपण माझ्यापेक्षा पक्षात आणि संघटनेत खूप ज्येष्ठ आहात. कोणीही चिंता करू नका, मी पक्षासाठीच काम करणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्रश्नाबाबत तुमचा वकील म्हणून काम करेन आणि तुमचा वकील हा मजबूत आहे, असा शब्द गोरे यांनी आमदार सुभाष देशमुख यांना दिला.

मोहोळ, करमाळा, माढा, माळशिरस आणि सांगोला याठिकाणी आपले आमदार नाहीत. आपण युतीमध्ये तर आहोतच मात्र शत प्रतिशत भाजप हे आपलं ध्येय आहे. उद्या मोहोळ आणि माढ्याचा आमदार भाजपचा व्हावा, असं कार्यकर्त्याला वाटणे साहजिक आहे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

Subhash Deshmukh-Jaykumar Gore-Dilip Mane
Dilip Mane : दिलीप मानेंनी टायमिंग साधलं; बाजार समिती निवडणूक रंगत असतानाच ‘दोस्ती अस्त्र’ काढले बाहेर, पालकमंत्र्यांशी बंद खोलीत चर्चा, दुपारी भोजन

ग्रामविकास खात हे सर्वांना न्याय देणारं खातं आहे, त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणार खातं माझ्याकडे आहे. मी सोलापूर जिल्ह्यासाठी नवीन आहे. माझ्यापेक्षा खूप सिनियर नेते आहेत, जेवढी माझी क्षमता आहे, तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करेन, त्यामुळे चिडायचं आणि रागवायचं नाही. मीदेखील पालकमंत्र्यांच्या केबिनबाहेर बसलेला कार्यकर्ता आहे, त्यामुळं ते दुःख मला माहिती आहे. आपल्या व्यासपीठावर युवा मोर्चाचा पदाधिकारी आणि लाडक्या बहिणीसाठी एक खुर्ची असायला पाहिजे, अशीही अपेक्षा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com