Sangli News : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज शनिवारी (ता.२५) अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे कराड दौऱ्यावर आल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी कराड (प्रीतिसंगम) येथील समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. (Latest Marathi News)
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "राज्य शासनाने विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे. मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज या सर्वांच्या मागणीसंदर्भात संवेदनशीलपणे चर्चा झाली पाहिजे. सर्व ताकदीने आम्ही त्यासाठी सहकार्य करायला तयार आहोत. मात्र, यावर आधी चर्चा झाली पाहिजे," असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा व अन्य समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात व्यक्त केले.
या वेळी त्यांनी भाजपवरही हल्लाबोल केला. "आधीची भाजप आता राहिलेली नाही. भाजप म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी बनलेली आहे. तपास यंत्रणांच्या कारवाया फक्त महाराष्ट्रातच कशा काय होत असतात? मराठा आरक्षणावर भुजबळ यांची जे काही वक्तव्ये येत आहेत, ते समाजासमाजात दंगली घडवण्यासाठी आहेत का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, दिसतं तरी तसंच, अशी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड जिल्हा सातारा येथील समाधीस्थळी त्यांच्या स्मृतिदिनाला अभिवादन करण्यासाठी खासदार सुळे आज कराड दौऱ्यावर आल्या होत्या. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकारमंत्री व आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.