Shambhuraj desai
Shambhuraj desaisarkarnama

दिवाळीत आरोग्याची काळजी घ्या : शंभूराज देसाईंचे जनतेला आवाहन

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. कुठेही गर्दी होणार नाही याबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी.
Published on

सातारा : दिवाळीचा सण हा एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण असून यानिमित्ताने बाहेरगावी असलेली मंडळी आपल्या गावी परत येऊन कुटुंबासोबत एकत्रितपणे हा सण साजरा करतात. कोरोना संसर्गाचा धोका कमी झाला असला तरी यंदाची दिवाळी प्रत्येकाने आनंदात पण साधेपणाने साजरी करताना आरोग्याची काळजी घ्यावी व प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. कुठेही गर्दी होणार नाही याबाबत प्रत्येकाने काळजी घ्यावी. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे प्रत्येकाने पालन करावे. यंदाची दिवाळी साजरी करताना आरोग्याची काळजी घ्यावी.

Shambhuraj desai
यंदाची दिवाळी सायकलवर...पेट्रोल-डिझेल शंभरी पार, ये क्या हो गया मोदी सरकार!

दिवाळी सण दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या उत्सवात दरवर्षी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. यावर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करतांना फटाके फोडणे टाळावे. फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदुषणाचा थेट परिणाम श्वसनावर होतो. त्यामुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही दिवाळी प्रदुषणमुक्त साजरी करतांना दिव्यांची आरास करून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई केले असून त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनता व सातारा जिल्हावासियांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com