Mahadik Pattern Tararani Aghadi : कोल्हापूरला महाडिक पॅटर्न दाखवणारी ताराराणी आघाडी भाजपात विसर्जित होणार?

Kolhapur local body election : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याच ताराराणी आघाडीची राजकीय भूमिका काय असणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Mahadik Pattern Tararani Aghadi
Mahadik Pattern Tararani Aghadisarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थासह विधान परिषद, विधानसभा मतदारसंघावर ज्या महाडिक गटाची सत्ता होती. ज्या कोल्हापूर जिल्ह्याला राजकारणातील महाडिक पॅटर्न अवघ्या जिल्ह्याला दाखवला. तीच ताराराणी आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपमध्ये विसर्जित होणार की? निवडणुकीच्या रिंगणात असणार याकडे जिल्हा वासियांचं लक्ष लागून राहिले आहे.

माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी स्थापन केलेली ही ताराराणी आघाडी मागील कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन नंबरवर राहिली होती. मात्र महाडिक कुटुंबीयांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने यंदाची निवडणूक पक्षीय पातळीवर लढवण्याचे संकेत दिले जात आहेत. यामुळे महाडिक गटाची ताराराणी आघाडी पुन्हा एकदा विसर्जित केल्याची घोषणा होणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

2016 च्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक भाजपसोबत ताराराणी आघाडी झेंड्याखाली लढवली. या निवडणुकीत काँग्रेस एक तर ताराराणी आघाडी दोन क्रमांकाच्या स्थानावर राहिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ताराराणी आघाडी भाजपमध्ये विसर्जित केली जाण्याची शक्यता आहे. वास्तविक माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी 1985 मध्ये कोल्हापूरच्या राजकारणात ताराराणी आघाडीची एन्ट्री केली.

Mahadik Pattern Tararani Aghadi
Dhananjay Mahadik : ज्यांची जमीन जाणार नाही ते पुढारपण करतायेत; खासदार महाडिकांनी पाटलांना सुनावले

सुरुवातीला महानगरपालिका, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील सर्वच सहकारी संस्था, विधानसभा आणि विधान परिषदेपर्यंत महादेवराव महाडिक यांनी मजल मारली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थेंवर महाडिक गटाची सत्ता राहिली. स्वतःच्या गटाबरोबरच सर्व उमेदवारांना देखील मदत करायची. निवडून आला की तो आपला असं सूत्रच महाडिक गटाचे ठरले होते. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक पॅटर्न राज्यभर ओळखला जाऊ लागला.

याच गटाला पुढे ताराराणी आघाडी म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे सध्याचे शिवसेना शहराध्यक्ष सुनील मोदी त्यांनी 2008 साली ताराराणी आघाडीला राजकीय पक्षाचा दर्जा मिळवून दिला. 2005 साली काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर ही आघाडी संपुष्टात आल्याची घोषणा स्वतः महादेवराव महाडिक यांनी केली. पण पुन्हा एकदा सोयीने या आघाडीचा जन्म झाला. नंतरच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी आणि जनसुराज्य शक्तीने महापालिकेवर वर्चस्व मिळवले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे चिरंजीव अमल महाडिक हे दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले. सहाजिकच महाडिक कुटुंबियाने भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यानंतरच्या झालेल्या 2016 च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि ताराराणी आघाडी या दोन्ही पक्षाने दणदणीत यश मिळवले. पण काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेने महापालिकेत सत्ता स्थापन केली.

Mahadik Pattern Tararani Aghadi
Dhananjay Mahadik on Satej Patil : ''शाहूंना पुढे करून श्रेय घेण्याचा डाव'', गडकरींना दिलेल्या निवेदनावरून धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना टोला!

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याच ताराराणी आघाडीची राजकीय भूमिका काय असणार याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. पक्षीय पातळीवर यंदाच्या निवडणुका होणार असल्याने आणि संपूर्ण महाडिक गट आता भाजपमध्ये असल्याने ताराराणी आघाडी ही भाजपमध्ये विसर्जित करावी लागणार आहे. आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढायचे झाल्यास भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला जागा वाटपाचा खरा सामना करावा लागणार आहे.

अशातच ताराराणी आघाडी म्हणून निवडणूक लढवायची झाल्यास भाजपमधून जागावाटप करावी लागणार आहे. त्यामुळे आघाडीची कोंडी ही निश्चित होणार आहे. सोबत जनसुराज्य शक्ती देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्याचा गुंता अधिक असणार आहे. आमदार अमल महाडिक, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे दोघेही भाजपकडून विद्यमान सदस्य आहेत. त्यामुळे पक्षाच्या सोबत राहून ताराराणी आघाडीची भूमिका घेणे उचित ठरणार नाही.

Mahadik Pattern Tararani Aghadi
Krishnaraj Mahadik: भाजप खासदाराच्या घरची 'ही' मराठी अभिनेत्री होणार सून..? मुलासोबतचा फोटो व्हायरल...

पण वास्तविक पाहता भाजपची राजकीय चाल वेगळे असू शकते. विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती या पक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने चंदगड आणि करवीरमधील महाविकास आघाडीचा पराभव केला आहे. त्याच पद्धतीने ताराराणी आघाडीतून अनेक उमेदवार उभे करून महाविकास आघाडीचा गेम करण्याचा प्लॅन भाजपचा असू शकतो. त्यामुळे भाजप ताराराणी आघाडीचा वापर सोयीस्कर करेल याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ताराराणी आघाडीची कोंडी होणार की भाजप सोयीचे राजकारण करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com