Teacher MLA : धक्कादायक; शाळा तपासणीच्या नावाखाली 80 हजार रुपयाची मागणी, शिक्षक आमदार भडकले

MLA Jayant Asgaonkar : शालेय लेखाविभागाविरोधात शाळा तपासणीच्या नावाखाली 80 हजार रुपयाची मागणी होत असल्यावरून शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी संताप व्यक्त केला आहे
MLA Jayant Asgaonkar
MLA Jayant AsgaonkarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शाळा तपासणीच्या नावाखाली 80 हजार रुपयाची मागणी होत असल्याची बाब शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या कानावर आली आहे. यावरून त्यांनी संताप व्यक्त करताना माध्यमिक शिक्षण विभागाचे लेखाधिकारी सागर वाळवेकर यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. हा सर्व प्रकार तातडीने बंद करावा, त्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला द्याव्यात, अशा शब्दात शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांना दम दिला. दरम्यान माध्यमिक शिक्षण विभागाच्या या भूमिकेचा विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणार असल्याची इशारा देखील आमदार आसगावकर यांनी दिला आहे.

आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षण विभागातील प्रलंबित कामाबाबत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. कामात होत असलेल्या दिरंगाईची गंभीर दखल घेत वेतन पथक अधीक्षक प्रवीण फाटक, लेखाधिकारी (उच्च माध्यमिक) नंदकिशोर भंडारी व लेखाधिकारी (माध्यमिक) सागर वाळवेकर यांचा खरपूस समाचार घेतला.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मंजूर झालेली बिलांमध्ये लेखाधिकाऱ्यांकडून त्रुटी का निघतात? त्रुटी निघल्यास संबंधित शिक्षकांना त्याबाबतची माहिती का देण्यात येत नाही. यासह अनेक प्रश्नांवर आमदार आसगावकर यांनी शिक्षण उपसंचालकांसह लेखाधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमारा केला आहे.

MLA Jayant Asgaonkar
Kolhapur Politics : शिक्षक बँक निवडणूक; काँग्रेसचे आमदार आसगावकर अन् दादा लाड भिडणार, लक्षवेधी लढत!

दरम्यान झालेल्या बैठकीत आमदार आजगावकर यांनी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करत प्रलंबित प्रश्नावर मार्ग काढला. शासनाला अहवाल सादर करताना त्यात शिक्षकांसोबत शिक्षकेतर कर्मचारी यांचाही उल्लेख केला जाईल. दर 6 महिन्याला उपसंचालक हे पाचही जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व संस्थाचालकांसमवेत बैठक घेतील.

उपसंचालक, वेतन पथक कार्यालयात कामासाठी येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्याची सक्त सूचना यावेळी करण्यात आली. टप्प्यावरील शिक्षकांचे पगार वेळेत करण्याचे ठरले. मंजूर झालेली बिले 20 फेब्रुवारीपर्यंत शिक्षण पसंचालक, पुणे येथे पाठवण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

MLA Jayant Asgaonkar
Jayant Asgaonkar : शिक्षण विभागाला शिक्षक आमदारच वैतागले; जयंत आसगावकरांचा आंदोलनाचा इशारा

यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे दोघेही लेखाधिकारी तसेच या वेतन पथक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कामासाठी येणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मानाची वागणूक द्यावी. त्यांची कामे अडविणे ही गंभीर बाब असून यापुढे अशी चूक मान्य केली जाणार नाही. अधिकाऱ्यांनी आपल्या कामात सुधारणा करावी. यावेळी अधिकारी, विविध शिक्षण संघटनेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com