Chandrapur Bribe Case : 'दस्तनोंदणीसाठी १५ हजार रुपये दे;' महिला अधिकाऱ्याची लाचखोरी रंगेहाथ पकडली

Chandrapur ACB Trap : एसीबीच्या वारंवार कारवाया तरी लाचखोरीचा प्रकार थांबेना
Bribe, ACB
Bribe, ACBSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील लाच घेण्याचे प्रकार काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. या प्रकाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोहीम उघडली आहे. मात्र, एका आठवड्यातच दोन अधिकाऱ्यांकडून लाच घेतल्याचे समोर आले आहे. उमरी पोतदारमधील घटनेनंतर आता मूल येथे एसीबीने कारवाई केली आहे.

उमरी पोतदार येथे सहा दिवसांपूर्वी १३ हजारांची लाच घेताना एका ग्रामसेवकावर कारवाई केली होती. यानंतर मूल येथे दुय्यम निबंधक कार्यालयातील एका महिला अधिकाऱ्याला १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली. वैशाली मिटकरी असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. (Latest Political News)

Bribe, ACB
Maratha Vs OBC Reservation : छगन भुजबळांची हकालपट्टी करा; मराठा समाज संतापला, नेमकं काय झालं ?

अधिक माहितीनुसार, तक्रारकर्ते मूल येथे दस्तलेखनाचे काम करतात. त्यांच्या एका पक्षकाराची शेतजमीन फेरफार करावयाची होती. यासाठी त्यांना दस्त तपासणी व शेतजमिनीचे मूल्यांकन काढून दस्ताची मुद्रांक व नोंदणी फीबाबत विचारणा केली होती.

या वेळी मिटकरी यांनी त्यांना दस्तनोंदणीच्या कामासाठी शासकीय शुल्काशिवाय १५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यांनी याबाबतची माहिती सहकारी दस्त लेखकास दिली. त्यानंतर त्यांनी लाचखोर अधिकाऱ्याविरोधात लाचलुचपत विभागाच्या चंद्रपूर येथील कार्यालयाकडे तक्रार केली. (Maharashtra Political News)

Bribe, ACB
Ajit Pawar Pune : पालकमंत्री अजितदादांच्या कामाचा धडाका सुरू; अधिकारीही झाले 'चार्ज'!

या प्रकरणी तक्रारीनुसार, एसीबी पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी शहानिशी केली. यानंतर तक्रारकर्त्यांनी दुय्यम निबंधक अधिकारी मिटकरी यांच्याशी तडजोड केली. १५ हजार रुपये देणे शक्य नसून, १० हजार रुपये देऊ, असे ठरले. ठरल्यानुसार गुरुवारी सायंकाळी १० हजार रुपयांची लाच घेताना वैशाली मिटकरी यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

आठवड्यात लाचखोरीच्या दोन घटना

चंद्रपूर जिल्ह्यात शासनाच्या विविध विभागात लाचखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एसीबीच्या वतीने वारंवार कारवाई होत आहेत. मात्र, लाचखोरीची चटक लागलेल्या अधिकाऱ्यांना त्यांची कसलीच भीती वाटत नाही. चंद्रपूरमध्ये आठवड्यातच लाचखोरांना पकडण्याच्या दोन घटना झाल्या. शासकीय काम करण्यासाठी कुणी लाच मागत असेल, तर थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशांत पाटील यांनी केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Bribe, ACB
Drug Mafia Lalit Patil : पाटीलच्या आईला भीती, ‘राजकारणी माझ्या मुलाचा एन्काउंटर करतील’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com