Satara Loksabha Constituency : उदयनराजे की शिंदे : कोरेगाव, कराडचा वाढलेला टक्का कोणाला साथ देणार?

Loksabha Election 2024 : महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासह 16 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले.
Udayanraje Bhosale, Shashikant Shinde
Udayanraje Bhosale, Shashikant ShindeSarkarnama

Satara loksabha Voting : सातारा लोकसभा मतदारसंघात आज अंदाजे 63.07 टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान कोरेगाव विधानसभा मतदारसंघात झाले, तर सर्वात कमी मतदान पाटण मतदारसंघात झाले आहे.गत पोट निवडणूकीच्या तुलनेत यावेळी घटलेली मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा रंगली आहे. एकूण 18 लाख 89 हजार 740 मतदारांपैकी 11 लाख, 91 हजार 869 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. काही किरकोळ घटना वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासह 16 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रांत बंद झाले. आता थेट 28 दिवसांनी (4 जून) साताऱ्याचा खासदार कोण होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. चार जूनला निकाल जाहीर होणार आहे.

Udayanraje Bhosale, Shashikant Shinde
Jaydatta Kshirsagar : जयदत्त क्षीरसागरांची राजकीय हतबलता की चाचपणी? 35 वर्षांत पहिल्यांदाच...

सातारा लोकसभा मतदारसंघात यावेळेस महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) अशी चुरशीची व प्रतिष्ठेची लढत आहे. राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष या लढतीकडे लागले असून एकीकडे छत्रपतींच्या घराण्याचे वंशज विरुद्ध सर्वसामान्य उमेदवार अशा या लढतीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार याची उत्सुकता आहे. त्यासाठी आज जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतील 2, 315 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया झाली. सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली.

विशेष म्हणजे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी कुटुंबासह एकत्र जाऊन सकाळी सात वाजून सात मिनिटांनी अनंत इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यांच्यासमवेत राजमाता कल्पनाराजे भोसले, पत्नी दमयंतीराजे भोसले उपस्थित होते. सुरुवातीला धिम्या गतीने; पण दहानंतर मतदानाचा वेग वाढला. सकाळी सात ते नऊ यावेळेत सात टक्के मतदान झाले होते. सकाळी अकरापर्यंत 18.85 टक्के मतदान झाले होते. यामध्ये सातारा विधानसभा मतदारसंघाने आघाडी घेतली होती. दुपारी एकनंतर केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनीही कुटुंबासह ल्हासुर्णे येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांच्या समवेत पत्नी वैशाली शिंदे, तेजस शिंदे, साहिल शिंदे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाचा आकडा वाढून तो 32.78 टक्क्यांवर पोचला. कोरेगाव मतदारसंघात सर्वाधिक 33.93 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर पुन्हा मतदानाचा वेग वाढला. दुपारी तीन वाजेपर्यंत 43.83 टक्के मतदान झाले होते. यामध्ये सर्वाधिक मतदान कऱ्हाड दक्षिणेत 46.38 टक्के झाले होते, तर सर्वात कमी मतदान पाटणमध्ये 41.74 टक्के झाले होते. दुपारी चारनंतर पुन्हा मतदानाचा जोर वाढला होता. त्यामुळे पाच वाजेपर्यंत 54.1 टक्के मतदान झाले होते.

यामध्ये कोरेगाव मतदारसंघातून सर्वाधिक 57.21 टक्के मतदान झाले होते, तर पाटणला सर्वात कमी 50.03 टक्के मतदान झाले. सायंकाळी सहापर्यंत सुमारे 63.07 टक्के मतदान झाले. 18 लाख 89 हजार 740 मतदारांपैकी 11 लाख 91 हजार 869 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Udayanraje Bhosale, Shashikant Shinde
Loksabha Election : पंतप्रधान मोदी-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर, सभेची तारीख ठरली

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी :

वाई 60.78

कोरेगाव 67.51

कऱ्हाड उत्तर 65.33

कऱ्हाड दक्षिण 65.68

पाटण 56.50

सातारा 62.77

दृष्टीक्षेपात...

साताऱ्यात अनेकांची मतदार यादीतील नावेच गायब

खोडशीत मतदानावर ग्रामस्थांचा बहिष्कार

म्हसवडला मतदान कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा त्रास

१६ ठिकाणी मतदान यंत्रे बदलावी लागली

डफळवाडी ग्रामस्थांचा बहिष्कार सहा तासांनंतर मागे

यादीत नाव नसल्याने शिरवडेत मतदारांमध्ये नाराजी

Udayanraje Bhosale, Shashikant Shinde
EVM Hack News : जवानाची अंबादास दानवेंचा EVM हॅक करण्याची ऑफर, काय आहे इनसाइड स्टोरी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com