Udayanraje Bhosale News : आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांनी एकदा लोकांपुढे येऊन खरे खोटे केलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी गांधी मैदान किंवा झेडपीचे मैदान घ्या..अन्यथा साताऱ्यात कुठेही, समोरासमोर यावे. लोकांना माईक द्या, उदयनराजेंनी पैसे खाल्ले असे म्हटलं तर मिशा काय भुवया काढून टाकी. आम्ही छत्रपतींचा वारसा पुढे नेत आहोत, असे आव्हान देऊन खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale म्हणाले, लोकांना कळू देत की भ्रष्ट कोण आणि क्रियानिष्ट कोण, असा टोलाही त्यांनी शिवेंद्रराजेंना Shivendraraje Bhosale लगावला.
आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या सातारा विकास आघाडीवर केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपला उदयनराजेंनी आज सडेतोड उत्तर दिले. सातारा पालिकेच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
उदयनराजे म्हणाले, राज्य शासन किंवा केंद्र शासन ही कोणाची मालमत्ता नाही. एखाद्याला नाव ठेवणं सोप असतं, त्यासाठी फारशी अक्कल नसली तरी चालते. ग्रेडसेपरेटर, भुयारी गटारचे काम असेल, ही विकास कामे करताना नागरीकांना झळ पोहोचणार आहे. माझ्याकडे जादूची कांडी असती तर आबरा का डाबरा केलं असतं. आजपर्यंत त्यांच्या घरात सत्ता होती. त्यावेळी तुम्ही सातारा शहर वासियांसाठी काय केलं ते सांगा, असा प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला.
उदयनराजे म्हणाले, नाव ठेवणं सोपं असतं. लोकांच्या जीवावर त्यांनी संस्था स्थापन केल्या. मला बोलायचे नव्हते पण अजिंक्यतारा कुकुटपालन, बझार, महिला बॅंक हे ते.. या संस्थातील लोकांचे पैसे खाल्ले. हे पाहता इतक्या मोठ्या घराण्यात ही लोक जन्माला आली कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जनतेची आयुष्याची पुंजी त्यांनी या संस्थांच्या माध्यमातून हडप केली.
उदयनराजे म्हणाले, एकदा लोकांपुढे खरं खोटं झालं पाहिजे. त्यासाठी गांधी मैदान, झेडपीचे मैदान घ्या.. अन्य कुठेही द्या. लोकांमध्ये माईक द्या. लोकांनी जर उदयनराजेंनी पैसे खाल्ले असे म्हणाले तर तर मिशा काय भुवया काढून टाकीन. आम्ही छत्रपतींचा वारसा पुढे नेत आहोत. पुराव्या निशी बोलायला आम्ही तयार आहोत. लोकांना माहिती आहे, भ्रष्ट कोण आणि क्रियानिष्ट कोण. सारखं सारखं भ्रष्टाचार, भ्रष्टाचार म्हणून हिणवत आहेत.
मुळात आम्ही लोकांची सेवा करत नसून तर मला या पदावर राहता येणार नाही. मी द्वेषापोटी बोलत नाही. त्यांनी काहीही म्हणू देत पण, आमची सातारा विकास आघाडी ही लोकांची आघाडी आहे. आमच्या जाहीरनाम्यात जे जे होते ते आम्ही पूर्ण केलं आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं. पण तरीही ते म्हणतात की आम्हीच सर्वकेलं. त्यांची पात्रता, लायकी नाही. मुळात त्यांच्या बद्दल बोलायला नको होते. स्वत:च्या हिंमतीवर माणूस मोठा होतो, पैशावर माणूस मोठा होत नाही.
पेंटींगच्या विषयावर उदयनराजे म्हणाले, मी कोणाला पेंटींग काढ असे सांगत नाही. त्यांना वाटलं म्हणून त्यांनी केलं असेल. सातारा राहू देत त्यांनी महाराष्ट्रात चलावे. आम्ही भ्रष्ट असतो, तर लोकांनी आम्हाला स्वीकारलं असतं का, असा प्रश्न करुन ते म्हणाले, त्यांना झीजन माहित नाही. यांना केवळ लोकांचा वापर करणं इतकच जमते, असे म्हणून त्यांनी अधिक बोलणं टाळलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.