
Ratnagiri News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यामागे एसीबीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांची एसीबीकडून चौकशी सुरू होती. आज मंगळवारी (ता.11) पुन्हा एकदा एसीबीने त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांना देखील चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. रत्नागिरीत एसीबीने त्यांची सहा तास चौकशी केली. यानंतर त्यांनी, मीडियाशी संवाद साधताना, महायुतीवर जोरदार टीका केली. विशेषत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी तोफ डागली असून त्रास देण्यासाठी अन् दबाव आणण्यासाठीच एसीबीची चौकशी लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वैभव नाईक यांना आणि त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांना एसीबीने चौकशीसाठी नोटीस बजावली होती. एसीबीने HUF व नाईक स्टोन इंडस्ट्रीजबाबत विचारणा करताना या मालमत्ता प्रकरणी दोघांनाही 20 वर्षाची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाईक दाम्पत्य रत्नागिरीत दाखल झालं होतं.
चौकशीनंतर वैभव नाईक यांनी मीडियाशी संवाद साधला. ‘एखाद्याला दबाव आणायचा असेल किंवा त्रासच द्यायचा असेल तर त्याला आपण काहीही करू शकत नाही. एसीबीच्या चौकशीला मी सहकार्य करणार आहे. आताही सहकार्य केलं आहे. पुढेही करेन, अशी प्रतिक्रिया नाईक यांनी यावेळी दिली.
तसेच एसीबीने चौकशीसाठी नोटीस बजावताना जी माहिती मागितली आहे. ती आपण दिली असून याव्यतिरीक्त वेगळी माहिती मागितल्यास ती ही देऊ, तशी आपली तयारी असल्याचेही वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.
तर त्यांच्यावर पक्षांतर करण्यासाठी अशा पद्धतीने दबाव आणला जातोय. यासाठीच एसीबीवर दबाव टाकला जातोय किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणूनच आपल्यासह पत्नीला बोलावलं असावं, असाही अंदाज वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
दरम्यान वैभव नाईक यांना याआधी 5 डिसेंबर 2022 रोजी पहिली नोटीस बजावण्यात आली होती. त्यावेळी नाईक चौकशीसाठी हजर होताना काही कागदपत्रं सोबत नेली होती. तर अन्य कागदपत्रं सादर करण्यासाठी वेळ मागितला होता.
त्यानंतर 28 जुलै 2023 रोजी त्यांना पुन्हा नोटीस बजावण्यात आली होती. यावेळी मात्र ते स्वतः न जाता अकाऊंटंट अमोल केरकर यांना पाठवले होते. यानंतर आता वैभव नाईक यांची आज पुन्हा चौकशी झाली आहे. पण यावेळी फक्त त्यांचीच नाही तर पत्नी स्नेहा नाईक यांचीही चौकशी झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.