Solapur, 23 April : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीला धोका देण्याचे काम केले आहे, त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे, असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे माढ्याचे उमेदवार रमेश बारसकर यांनी गायकवाड यांच्यावर केला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Aghadi candidate) उमेदवार राहुल गायकवाड (Rahul Gaikwad) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मी सोलापूरच्या मैदानात लढण्यासाठी उतरलो होताे. माझ्या हातात बंदूक देण्यात आली होती. मात्र, त्यासाठी गोळ्याच दिल्या नाहीत. त्याऐवजी मला छर्ऱ्हे दिले आहेत, असा आरोप केला होता. त्यावर रमेश बारसकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वंचितचे माढ्याचे (Madha Loksabha) उमेदवार बारसकर म्हणाले, राहुल गायकवाड आणि माझी दोन वेळाच भेट झाली होती. एकदा मुंबईत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या कार्यालयाबाहेर आणि १५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरताना संयुक्त मिरवणूक काढली, त्यावेळी दुसऱ्यांदा भेट झाली होती. त्यानंतर आमच्यात कोणताही संवाद झाला नव्हता. मी माढ्यात प्रचारात होतो. ते त्यांच्या कामात होते. पण, लोकांना वाटतं होतं की माढ्याचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार तळमळीने प्रचार करत आहे. पण, सोलापूरचा उमेदवार प्रचार करताना मागे मागे घेत आहे, असं चित्र दिसत होतं.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी वंचित बहुन आघाडीला धोका देण्याचे काम केले आहे. नाव कमावण्यासाठी आयुष्यभर काम करावं लागतं. प्रामाणिक राहावं लागतं. पण, पैसे कमावण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग अवलंबला जातो. पैसे शेवटपर्यंत टिकत नाहीत. तुमचं नाव शेवटपर्यंत टिकतं, असा टोलाही त्यांनी राहुल गायकवाड यांना लगावला.
बारसकर म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड यांच्यावर जो विश्वास दाखवला होता. तो त्यांनी गमावला आहे. राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्यानंतर संविधान वाचणार आहे, हे मला पटणारं नाही. तुम्हाला संविधान वाचवायचं होतं, तर तुम्ही काय काम केलं. कुठच्या चळवळीत आपण सहभागी झाला होता. तुम्ही निवडणूक लढविण्याचा निर्णय पहिल्यांदा का घेतला होता, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ शकतात. त्या खोलात मला जायचे नाही. पण राहुल गायकवाड यांनी पक्षाशी गद्दारी करण्याचे काम केले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.