Mohol Assembly : काँग्रेस विचारांच्या मोहोळमध्ये यंदा कमळ फुलेल का?

Lok Sabha Election 2024 : मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष विचारांना मतदान करणारी मोहोळची जनता या वेळी भाजपचे कमळ स्वीकारणार का?, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे राजन पाटील यांचा सर्वाधिक मताधिक्याचा शब्द पूर्ण होणार का?, याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे.
Rajan Patil-Ram Satpute
Rajan Patil-Ram SatputeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 April : उमेदवारी अर्जाच्या माघारीनंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. ‘वंचित’च्या माघारीनंतर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात थेट लढत होणार आहे. महायुतीकडे पाच आमदार आहेत, त्यात मोहोळचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. माजी आमदार राजन पाटील यांनी सातपुते यांना मोहोळमधून सर्वाधिक मताधिक्य देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष विचारांना मतदान करणारी मोहोळची जनता या वेळी भाजपचे कमळ स्वीकारणार का?, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे राजन पाटील यांचा सर्वाधिक मताधिक्याचा शब्द पूर्ण होणार का?, याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघारीच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तत्पूर्वी एमआयएम पक्षाने सोलापूरमध्ये उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले, त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत मतांची विभागणी होणार नाही, हे निश्चित आहे. त्यामुळे राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajan Patil-Ram Satpute
Sangli Lok Sabaha 2024 : सांगलीतील काँग्रेस नेते शिवसेनेचे चंद्रहार पाटलांच्या प्रचारात उतरणार का?

सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) मोहोळ विधानसभेचा समावेश होतो, यात उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 गावे जोडलेली आहेत. या मोहोळ मतदारसंघात आतापर्यंत पाच वेळा काँग्रेसचा, दोन वेगळा शेतकरी कामगार पक्षाचा आणि पाच वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) उमेदवार निवडून आलेले आहे. आतपर्यंतच्या इतिहासात एकदाही मोहोळने सांप्रदायिक शक्तीच्या पक्षाला जवळ केलेले नाही. कायम काँग्रेस आणि शेकापच्या विचारांबरोबर राहिलेला हा मतदारसंघ आहे.

मोहोळचे पहिले आमदार गोविंदराव भाऊराव बुरगुटे यांच्यापासून विद्यमान आमदार यशवंत माने यांच्यापर्यंत कायम धर्मनिरपेक्ष उमेदवाराच्या पाठीशी मोहोळची जनता राहिलेली आहे. मोहोळमधून बुरगुटे यांच्यानंतर शहाजीराव पाटील हे तीन वेळा निवडून आले आहेत. चंद्रकांत निंबाळकर हे दोनदा, तर तीनदा राजन पाटील (Rajan Patil) यांनी मोहोळचे प्रतिनिधित्व केले आहे. लक्ष्मण ढोबळे, रमेश कदम आणि यशवंत माने हे प्रत्येकी एक वेळा निवडून आलेले आहेत. अगदी मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आलेला आहे.

Rajan Patil-Ram Satpute
Sambhjinagar Constituency : संभाजीनगरात विनोद पाटील भुमरेंशी खेटले, मुख्यमंत्र्यांवर पुन्हा उमेदवार बदलण्याची नामुष्की का?

लोकसभेच्या 2014 आणि 2019 च्या मोदी लाट असलेल्या निवडणुकांमध्येही राजन पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मताधिक्य दिले आहे. जयसिद्धेश्वर महास्वामी आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या लढतीत मोहोळमधून राजन पाटील यांनी शिंदे यांना जवळपास 16 हजारांचे मताधिक्य दिलेले आहे. दरम्यान, मोहोळ मतदारसंघातून आजपर्यंत काँग्रेस विचारांचा आमदार निवडून आला असला तरी मोहोळचे क्षीरसागर कुटुंबीय आणि दीपक गायकवाड यांच्यासारख्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून शिवसेना आणि भाजपनेही आपली ताकद वाढवत नेलेली आहे.

Rajan Patil-Ram Satpute
Mohol Politics : फडणवीसांचा निकटवर्तीय भाजप नेता बुधवारी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत मोहोळचे माजी आमदार राजन पाटीलही महायुतीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे ते महायुतीचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी सूत्रं हलवित आहेत. त्यांनी सातपुते यांना मोहोळमधून सर्वाधिक मताधिक्य देण्याचे जाहीर केले आहे. ‘राजन पाटील बोले आणि मोहोळ हले’ असे आतापर्यंतचे समीकरण होते. मात्र, मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत दोन गट आहेत, त्यामुळे यंदा राजन पाटील आपला शब्द खरा करून दाखवणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

जनता विकासाला साथ देईल : राजन पाटील

या संदर्भात मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील म्हणाले, मोहोळ मतदारसंघ हा विकासाच्या विचारसरणीचा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेली 25 वर्षांत आमच्या तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे विकासाचे व्हिजन असणाऱ्या पक्षाच्या पाठीशी मोहोळ कायम उभा राहिला आहे. आम्ही 1995 पासून राजकारणविरहित काम करत आलो आहोत, त्यामुळे या तालुक्याने 1995 पासून कायम आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे याही निवडणुकीत तालुक्यातील जनता विकासाला साथ देईल.

R

Rajan Patil-Ram Satpute
Solapur, Madha Lok Sabha : सोलापुरात 11, तर माढ्यातून सहा उमेदवारांची माघार; ‘वंचित’ची माघार धक्कादायक!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com