Solapur Loksabha : उमेदवाराच्या माघारीनंतर वंचितची मोठी खेळी, प्रणिती शिंदेंचे टेन्शन वाढणार

Loksabha Election : वंचितच्या उमेदवाराचा थेट फटका काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना बसण्याची शक्यता होती. मात्र, राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला होता.
prakash ambedkar
prakash ambedkar Sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : वंचित बहुजन आघाडीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी दिली होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहुल गायकवाड यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. तसेच गंभीर आरोप करत आपल्याला पक्षाचा पाठींबा मिळाला नसल्याचे सांगितले. आपण काँग्रेस आणि भाजपला BJP पराभूत करण्यासाठी लोकसभेच्या रिंगणात उतरलो होतो मात्र आपल्यामुळे भाजपचा विजय होतो आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे राहुल गायकवाड यांनी सांगितले होते.

prakash ambedkar
Latur Congress News : काकांचा सल्ला ऐकला अन् अमित देशमुखांचे काँग्रेसमध्ये वजन वाढले...

वंचितच्या उमेदवाराचा थेट फटका काँग्रेस Congress उमेदवार प्रणिती शिंदे यांना बसण्याची शक्यता होती. मात्र, राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आतिश मोहन बनसोडे यांना पक्षाचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीने VBA ट्विटरच्या माध्यमातून दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापुरातील प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आतिश मोहन बनसोडे यांना मतदान करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, अचानकपणे त्यांनी पक्षाला माहिती न देता उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वंचित बहुजन आघाडीने मोहन बनसोडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे वंचितच्या वतीने सांगण्यात आले.

शिंदे विरुद्ध सातपुतेंमध्येच लढत

वंचितच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतली. मात्र वंचितने अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला असला तरी प्रमुख लढत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यात होणार असल्याचे चित्र आहे. वंचितने अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिल्याने वंचितची किती मते त्याच्याकडे वळणार हा देखील उत्सुकतेचा विषय असणार आहे.

prakash ambedkar
Nashik lok Sabha 2024: नाशिकमधील ट्विस्ट काही संपेना! गोडसे लागणार धक्क्याला; भुजबळांच्या कुटुंबातील उमेदवार भाजपकडून लढणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com