Andhare's Controversial Statement : ठाकरे गटाच्या नेत्याही अडचणीत; मालेगावात गुन्हा, श्रीरामांबद्दलचे विधान भोवले...

Shivsena Leader News : अंधारे यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा परदेशी यांचा दावा आहे.
Sushma Andhare
Sushma Andhare Sarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare News : शिवसेनेच्या आक्रमक उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. धार्मिक भावना दुखावल्याने मालेगाव पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case has been registered against Sushma Andhare in Malegaon police station)

मालेगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते अमन परदेशी यांनी याबाबत तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. श्रीमती सुषमा अंधारे यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा परदेशी यांचा दावा आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी भादंवि २९५-अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संबंधितांचे जबाब नोंदविल्यानंतर श्रीमती अंधारे यांनाही पोलिस पाचारण करणार आहेत, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sushma Andhare
Jitendra Awhad Controversy : जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीतही एकाकी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील मेळाव्यात बोलताना श्रीराम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यात गदारोळ माजला आहे. त्यांच्याविरुद्धही पोलिसांमध्ये तक्रार करण्याची तयारी सुरू आहे.

अशातच अंधारे यांच्यावर मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेरण्याची रणनीती आक्रमकपणे पुढे नेण्याची तयारी केल्याचे दिसून येते.

यासंदर्भात तक्रार देणारे अमन नवल किशोर परदेशी हे पुणे येथे शिक्षण घेत आहेत. त्यांचे मित्र किरण हिरे आणि श्याम देवरे यांनी आपल्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार ॲड. सुधीर कक्कर यांच्यामार्फत पोलिसांत केली आहे.

Sushma Andhare
Karmala Politics : पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरुंना व्हायचंय आमदार; करमाळ्यातून रणशिंग फुंकले

एका यूट्यूब चॅनेलवर श्रीमती अंधारे या श्रीराम यांच्या वनवासातील कालावधीतील काही विषयांवर विधाने करीत असल्याचे दिसते. त्यामुळे आपल्या भावना दुखावल्या असून भारतीय पुरावा कायदा कलम ६५ ब अन्वये यूट्यूबवरील क्लिप पुरावा म्हणून ग्राह्य धरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By-Vijay Dudhale

Sushma Andhare
Nashik News : कर्जाचा बोजा बळिराजाच्या मुळावर; नाशिकमध्ये 5000 शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com