ZP Election : उमेदवारांची धाकधूक वाढली; पहिल्या दोन तासांत अवघे 19 टक्के मतदान

Solapur Political News : सोलापूर जिल्हा परिषद व 11 पंचायत समित्यांसाठी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. मात्र पहिल्या दोन तासांत केवळ 19 टक्के मतदान झाल्याने उमेदवार व नेत्यांची चिंता वाढली आहे.
ZP Election
ZP ElectionSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 07 February : सोलापूर जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समित्यांसाठी शनिवारी सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पण पहिल्या दोन तासांत अत्यंत संथ गतीने मतदान होत आहे. सकाळी साडेसात ते अकरा या दोन तासांत अवघे 19 टक्के मतदान झाले आहे, त्यामुळे उमेदवार आणि नेतेमंडळींची धाकधूक वाढली आहे. सायंकाळ साडेपाचपर्यंत किती मतदान होणार, याकडे उमेदवारांसह नेतेमंडळींचे लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) 68 आणि 11 पंचायत समितीच्या 136 जागांसाठी तब्बल नऊ वर्षांनंतर मतदान होत आहे, त्यामुळे झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. मात्र, ती उत्सुकता मतदारांमध्ये पहिल्या दोन तासांमध्ये तरी दिसून आलेली नाही, त्यामुळे मतदानाची एकूण टक्केवारी कितीपर्यंत जाणार, याबाबत उत्सुकता आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये पहिल्या दोन तासांत सर्वाधिक 22.45 टक्के मतदान हे उत्तर सोलापूरमध्ये झाले असून त्या खालोखाल बार्शी तालुक्यात 22.30 टक्के मतदान झाले आहे. सर्वांत कमी मतदान हे मंगळवेढा तालुक्यात झाले असून ते 17.21 टक्के इतके आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सकाळच्या पहिल्या दोन तासांत झालेले तालुकानिहाय मतदान पुढीलप्रमाणे

करमाळा

एकूण मतदान : 208023

झालेले मतदान : 38126

पुरुष : 23964

स्त्री : 14162

टक्केवारी : 18.33

...........

माढा

एकूण मतदान : 258714

झालेले मतदान : 46187

पुरुष : 29114

स्त्री : 17073

टक्केवारी : 17.85

.....................

बार्शी

एकूण मतदान : 214754

झालेले मतदान : 47889

पुरुष : 26148

स्त्री : 21741

टक्केवारी : 22.30

ZP Election
Girish Mahajan : CM फडणवीसांच्या सलग दुसऱ्या परीक्षेत गिरीश महाजन पहिल्या नंबरने पास; आता तरी पालकमंत्रीपद मिळणार का?

उत्तर सोलापूर

एकूण मतदान : 88992

झालेले मतदान : 19980

पुरुष : 11076

स्त्री : 8904

टक्केवारी : 22.45

.....................

मोहोळ

एकूण मतदान : 198338

झालेले मतदान : 36330

पुरुष : 22754

स्त्री : 13576

टक्केवारी : 18.32

.........................

पंढरपूर

एकूण मतदान : 285826

झालेले मतदान : 50541

पुरुष : 31088

स्त्री : 19453

टक्केवारी : 17.68

......................

माळशिरस

एकूण मतदान : 318281

झालेले मतदान : 61875

पुरुष : 38372

स्त्री : 23502

टक्केवारी : 19.44

......................

सांगोला

एकूण मतदान : 262367

झालेले मतदान : 50243

पुरुष : 30213

स्त्री : 20030

टक्केवारी : 19.15

..........................

ZP Election
Mumbai Mayor election : मुंबई महापौरपदासाठी 'भाजपचा' मास्टरस्ट्रोक; रितू तावडेंच्या निवडीमागे दडलेलं राजकारण 5 मुद्द्यात समजून घ्या!

मंगळवेढा

एकूण मतदान : 169536

झालेले मतदान : 29174

पुरुष : 17389

स्त्री : 11785

टक्केवारी : 17.21

.........................

दक्षिण सोलापूर

एकूण मतदान : 223367

झालेले मतदान : 40396

पुरुष : 22420

स्त्री : 17976

टक्केवारी : 18.09

...........................

अक्कलकोट

एकूण मतदान : 231029

झालेले मतदान : 48059

पुरुष : 25912

स्त्री : 22147

टक्केवारी : 20.80

........................

एकूण मतदान : 2459227

झालेले मतदान : 468800

पुरुष : 278450

स्त्री : 190349

सरासरी टक्केवारी : 19.06

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com