

Pandharpur, 11 August : समाजाच्या नावाखाली राजकीय दलाली करणारे लक्ष्मण हाके समाजाचे काय हित साधणार आहेत. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच मला शिव्या द्यायच्या, ही भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांनी मला वेळ सांगावी, मी त्यांच्या गावी देखील यायला तयार आहे. जगह उसकी, वक्त उसका. मैं आने के लिये तय्यार हूं अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर पलटवार केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आर्थिक रसद पुरवली आहे, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी सोमवारी (ता. 10 ऑगस्ट) पंढरपुरात केला होता. त्यांच्या या आरोपावर आमदार प्रसाद लाड यांनी पलटवार करत हाकेंवर जोरदार हल्लाबोल केला.
आमदार लाड म्हणाले, समाजाच्या नावाखाली लक्ष्मण हाके यांना राजकीय पोळी भाजायची आहे. विधान परिषदेत जायचे होेते, म्हणून ते दोन-अडीच तास एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर बसत होते, तो समाजाचे काय हित करणार आहे. समाजाचे नेते आहात, तर तुम्ही मंत्रालयात का फेऱ्या मारता, असा सवालही आमदार लाड यांनी उपस्थित केला.
हाके यांच्या मनात माझाविषयी एकच द्वेष आणि राग आहे की, मी मनोज जरांगे पाटील यांना मदत करतो. मी मनोज जरांगे यांना वैयक्तीक नाही, तर मनोज जरांगे नावाच्या एका कार्यकर्त्याला व आंदोलकाला मदत करतोय. जो मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे संघर्ष करतोय, ज्याला कुठला ही राजकीय स्वार्थ नाही. कुठलेही राजकीय पद नकोय, समाजाचे हित हे त्यांचे ध्येय धोरण आहे. मी समाजाचा एक घटक आहे. म्हणून त्यांना मदत करतोय. यात कुठेही मी वावगे केले नाही.
लाड म्हणाले, जरांगे यांची भाषा चुकीची असेल तर त्यांच्यावरही मी टीका केली आहे. ज्या ज्या वेळी ते मुख्यमंत्री देवेंंद्र फडवणीस यांच्यावर बोलले, त्या त्या वेळी मी त्यांच्यावर बोलोय. मनोज जरांगे समाजाचे काम करतात. मी पक्षाचे काम करतोय. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. ज्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली त्यावेळी पहिल्यांदा अंगावर घेणारा प्रसाद लाड होता.
लक्ष्मण हाके यांचा माझाविषयी गैरसमज निर्माण झाला आहे. ओबीसीचे काढून मराठा समाजाला द्या, अशी मी कधीही भूमिका घेतली नाही. ज्याच्या हक्काचं आहे, त्यांना मिळालं पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मांडल्याचे आमदार लाड यांनी सांगितले.
मी मुंबईचं अंडरवर्ल्ड पाहिलंय
लक्ष्मण हाके हा एकच ओबीसी नेता आहे का? असा सवाल करत इतर कोणत्याही ओबीसी नेत्यांनी माझ्याविषयी कधीच वाईट आक्षेप घेतले नाहीत. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी प्रसाद लाड यांना शिव्या द्यायच्या, ही भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतली आहे. त्यांनी मला वेळ सांगावी मी त्यांच्या गावीदेखील यायला तयार आहे.
आम्ही परळ लालबागमध्ये लहानाचे मोठे झाले आहोत. मी मुंबईचे अंडरवर्ल्ड पाहिले आहे. त्याने मला कुठ यायचे सांगावे. मी तिथे यायला तयार आहे, असे आव्हानही आमदार लाड यांनी हाके यांना दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.