Gokul Dudh Sangh : ‘गोकुळ’मध्ये पुन्हा अरुणोदय की नव्या रक्ताला संधी; नव्या अध्यक्ष निवडीसाठी घडामोडींना वेग, पाटील-मुश्रीफांचा पुढील डाव काय?

Kolhapur Political News : पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक जिंकून देणारा आणि परखड भूमिका असणारा अध्यक्ष गोकुळ दूध संघावर हवा आहे. त्यामुळेच मुरब्बी राजकीय चेहरा आणि महायुतीच्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध राखून असलेला व्यक्तीच गोकुळच्या अध्यक्षपदी बसवला जाणार आहे, हे निश्चित आहे.
Gokul Dudh Sangh : Satej Patil-Hasan Mushrif
Gokul Dudh Sangh : Satej Patil-Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 06 May : कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची आर्थिक नाडी आणि जिल्ह्याचे राजकीय केंद्रबिंदू असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या नव्या अध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा कार्यकाळ आठवडाभराने संपणार आहे, तत्पूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ दूध संघाची (Gokul Dudh Sangh) निवडणूक जिंकून देणारा आणि परखड भूमिका असणारा अध्यक्ष गोकुळ दूध संघाच्या नेत्यांना हवा आहे. त्यामुळेच मुरब्बी राजकीय चेहरा आणि महायुतीच्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध राखून असलेला व्यक्तीच गोकुळच्या अध्यक्षपदी बसवला जाणार आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे ‘गोकुळ’मध्ये पुन्हा अरुणोदय होणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार, याची उत्सुकता असणार आहे. महाविकास आणि महायुतीचे जिल्ह्यातील राजकीय समीकरण पाहता, सध्या अरुण डोंगळे यांच्याच नावाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याचे प्रमुख राजकीय केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघावर महाडिक गटाची 25 वर्षे सत्ता होती. आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाने तीन उधळून लावत गोकुळवर वर्चस्व मिळविले होते. आता पुन्हा पुढील वर्षी गोकुळची निवडणूक होणार आहे. सध्या पाटील आणि मुश्रीफ गटाची सत्ता गोकुळ दूध संघावर आहे. महाडिक गट विरोधात आहे.

गोकुळ दूध संघाची निवडणूक ही दोन्ही गटासाठी महत्त्वाची असून आतापासूनच दोघांनीही डावपेच आखायला सुरुवात केली आहे. सत्ताधारी पाटील-मुश्रीफ (Satej Patil-Hasan Mushrif) गटाला ही निवडणूक मागील निवडणुकीप्रमाणे सोपी नाही. विरोधकांनी आत्तापासूनच व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. मागील निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी महाविकास आघाडी राज्यात सत्तेत असल्याने या तीनही पक्षांतील जिल्ह्यातील नेते एकत्र झाले.

Gokul Dudh Sangh : Satej Patil-Hasan Mushrif
Mahadev Jankar : राहुल गांधींकडून मिळालेल्या सन्मानाने महादेव जानकर भारावले; राजकीय वाटचालीबद्दलही केले सूचक विधान

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, आमदार विनय कोरे, माजी आमदार राजेश पाटील यांनी एकत्र येत गोकुळ दूध संघात परिवर्तन केले.

सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता महायुती म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट आणि भाजप सत्तेत आहे, त्यामुळे महाडिक गटाने आतापासूनच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार असल्याने सध्या तरी गोकुळच्या निवडणुकीत महायुती एकत्र दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. पण, निवडणुकीवेळी मुश्रीफ यांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे. शिवाय गोकुळचे दोन प्रमुख नेते, माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यावर पाटील आणि मुश्रीफ गटाची भिस्त आहे.

महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचे धोरण ठरल्यास सत्ताधारी पाटील आणि मुश्रीफ गटाला धक्का बसू शकतो. शिवाय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाही महायुतीमधून निवडणूक लढवावी लागेल. पण, विश्वास पाटील आणि डोंगळे यांची मैत्री कायम राहिल्यास त्याचा फटका विरोधी गटाला बसू शकतो.

Gokul Dudh Sangh : Satej Patil-Hasan Mushrif
Deepak Kesarkar : केसरकरांच्या निकटवर्तीयांची 'शक्तिपीठ' मार्गात कोट्यावधींची गुंतवणूक; समर्थनामागची Inside Story ठाकरे गटाने सांगितली!

वास्तविक पाहता पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील राजकीय गणित पाहता सध्या महाविकास आघाडीकडे गोकुळची सत्ता आहे. शिवाय जिल्ह्यावर राजकीय पकड मिळवायची झाल्यास गोकुळ दूध संघ महत्त्वाचा मानला जातो. अशावेळी सतेज पाटील यांनीही तयारी सुरू ठेवली आहे. याच अनुषंगाने गोकुळच्या तिसऱ्या अध्यक्षाची चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर आणि महायुतीच्या वर्चस्वापुढे गोकुळचा पुढचा अध्यक्ष कोण असावा? यावर सलामसलत सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com