Swarajya Sanghatana : स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर वादावादी!

Anewadi Toll Naka : सुमारे तासभर टोलनाका बंद; वाहने टोल शिवाय झाली रवाना
Swarajya Sanghatana
Swarajya SanghatanaSarkarnama
Published on
Updated on

Satara News : कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आनेवाडी टोलनाका व्यवस्थापनाशी शनिवारी सायंकाळी जोरदार वादावादी झाली. हा प्रकार सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडला. या वादावादी मुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सुमारे अर्धा ते पाऊण तास येथील वाहतूक विस्कळीत झाली. येथील सर्व वाहने टोल शिवाय रवाना झाली. काही वेळ टोलनाका बंद ठेवण्यात आला होता.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण कोल्हापुरवासीयांनी राजकीय एकी दाखवून कोल्हापूर टोलनाका बंद करून जुलमी अशा टोलपासून स्वतःची मुक्ती करून घेतली. सातारा जिल्ह्यात आनेवाडी टोलनाका बंद करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असूनही ती दाखवली जात नाही. त्यामुळे वीस किलोमीटरच्या परिक्षेत्रातील सातारकरांना अजूनही टोल वसुलीचा जाच सोसावा लागत आहे, असे असतानाही सातारकरांकडून कोणतीही तीव्र प्रतिक्रिया आली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Swarajya Sanghatana
Kolhapur Political News : कोल्हापुरात श्रेयवादाची लढाई; आशिष ढवळेंची शारंगधर देशमुखांवर बोचरी टीका, म्हणाले...

मात्र शनिवारी कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सात ते आठ गाड्या एकाच वेळी टोल नाक्यावर आल्या. टोल देण्यावरून त्यांची टोल व्यवस्थापनाशी जोरदार वादावादी झाली. हा प्रकार सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडला टोल व्यवस्थापन व कर्मचारी यांच्या दरम्यान झालेल्या वादावादीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

टोलनाक्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या प्रचंड रांगा लागल्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी टोल देणार नाही अशी भूमिका घेत व्यवस्थापनाला वाहतूक सुविधांच्या संदर्भात जाब विचारल्याची ही चर्चा आहे.

Swarajya Sanghatana
Miraj BJP Dispute : कामगारमंत्री खाडेंशी पंगा घेणे आले अंगलट; भाजप नेत्याला पदाला मुकावे लागले

भुईंज पोलीस ठाण्याची पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली होती मात्र वातावरणात तणाव कायम होता स्वराज्य संघटनेची सर्व वाहने टोल शिवाय रवाना झाली. काही काळ टोल नाका हा बंद करण्यात आला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com