
Pandharpur News : राष्ट्रवादीचे नेते कल्याण काळे यांचा सहकार शिरोमणी साखर कारखाना नेहमीप्रमाणे यंदाही आर्थिक अडचणीत आहे.नुकतेच या कारखान्यास राज्य सरकारच्या थकहमीमुळे कर्ज मिळाले असून मागील वर्षीची शेतकऱ्यांची थकलेली बिले नुकतीच दिलेली आहेत.
मागील पाचपैकी तीन वर्षे कारखान्यावर एफआरपी देण्यासाठी आरआरसीची कारवाई करावी लागलेली आहे.ऊसाचे बिल देण्याबाबत सहकार शिरोमणीचा असा बदलौकिक झालेला आहे.यातच आता कारखान्यासमोर नवं संकट उभं ठाकलं आहे.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचा (Sahakar Shiromani Vasantrao Kale Sugar Factory) गाळप हंगाम सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरीही साखर कारखान्याची दुसरी पाळी सुरू झालेली नाही. उसा अभावी कारखाना एकच शिफ्टमध्ये चालत असून १६ ते १८ तास बंद ठेवावा लागत आहे. यावरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सहकार शिरोमणीच्या संचालक मंडळावर विश्वास नसल्याचे दिसत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंढरपूर तालुक्यातील सर्वच साखर कारखान्याचे गाळप हंगाम सुरू झालेले आहेत.यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जास्तीत जास्त ऊस गाळप करून तोटा कमी करण्याचा प्रयत्न सर्व साखर कारखानदार करीत आहेत. त्यामुळे उसाची पळवापळवी, ऊसदराची शर्यत वेगवान झालेली आहे.
चार महिन्यापूर्वी झालेल्या संचालक मंडल निवडणुकीत ज्या सभासदांनी विश्वास दाखवून काळे यांचे पॅनल निवडून आणले, त्याच पॅनेलवर शेतकऱ्यांचा आता विश्वास राहिला नसल्याने कल्याण काळे (Kalyan Kale) यांचे कारखान्यासह राजकारणही अडचणीत आले आहे.
पुढील वर्षी ऊस अभावी साखर कारखाने बंद ठेवावे लागतील, यंदा जेवढा ऊस मिळेल तेवढे गाळप करून तोटा कमी करू या हिशोबाने यंदा तालुक्यात ऊस गाळप जोमाने सुरू झालेले आहे. सहकार शिरोमणी ची स्पर्धा विठ्ठल सहकारी सोबतच आहे. विठ्ठल ने मागील हंगामातील बिले देऊन यंदा पहिली उचल २५५० जाहीर केली होती. या कारखान्याचे गाळप जोमाने सुरू आहे. सहकार शिरोमणीचा गाळप हंगाम मात्र रडत - खडत सुरू आहे.
मागील पाच, सात वर्षात ऊस बिले वेळेवर न मिळाल्याने यंदा शेतकरी सहकार शिरोमणीला ऊस देण्यास तयार नाही. चेअरमन कल्याण काळे यांच्या निकटवर्तीयानीसुद्धा आपला ऊस विठ्ठल, सीताराम, सहकार महर्षी, राजेवाडी, माळीनगर शुगर्स, शंकर सहकारी ला देण्यास प्राधान्य दिले आहे. (Pandharpur News)
यंदा गाळपास ऊस मिळणार नाही, हे सुरुवातीलाच लक्षात आल्यानंतर कल्याण काळे यांनी उसाला पहिली उचल २ हजार ७०० रुपये एवढी जाहीर केली आणि पहिल्या दहा दिवसातील गाळप मस्टर चे पेमेंट या दराने काढलेही. मात्र तरीही सहकार शिरोमणीला शेतकरी ऊस द्यायला तयार नाहीत. त्यामुळे सध्या दिवसभरात कसे बसे पाचशे ते सातशे टन ऊस गाळप होत आहे.
गाळप हंगाम सुरू होऊन पंधरा दिवस झाले आहेत आणि अद्यापही कारखान्याचे गाळप १० हजार टन सुद्धा झालेले नाही. तोडणी, वाहतूक यंत्रणा नाही, चिटबॉय उसासाठी बांधा बांधावर फिरत आहेत मात्र शेतकरी ऊस द्यायला तयार नाहीत. एकूणच यंदा कल्याण काळे यांच्या सहकार शिरोमणीचे आर्थिक संकट सरले असेल तरी नो केन चे संकट मात्र कायम असल्याचे दिसत आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.