Samadhan Autade : पोटनिवडणुकीत तुम्ही मला निवडून दिलं अन वर्षभरात महायुतीचं सरकार आलं; समाधान आवताडेंचा दावा

Pandharpur-Mangalvedha Politics : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांतील विकास निधीची बेरीज करत आणली आणि माझ्या दोन वर्षांच्या काळातील बेरीज केली तर ती बरोबर येईल.
Samadhan Autade
Samadhan AutadeSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 03 September : ज्या वेळी महाविकास आघाडीचे सरकार होते, त्या वेळी झालेल्या पोटनिवडणुकीत आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला. आपण मला निवडून विधानभवनात पाठवलं. मी विधान भवनात गेल्यानंतर एक वर्षाच्या आत महाविकास आघाडीचं सरकार पाडून महायुतीचं सरकार आलं.

म्हणजे आपल्या मतदारसंघाचा पायगुण एवढा मोठा ठरला की, तुम्ही दिलेल्या लोकप्रतिनिधीमुळे महाविकास आघाडीचं सरकार पाडून आपलं महायुतीचं सरकार आलं, असे विधान पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी केले.

पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील इसबावी येथील रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात आमदार आवताडे बोलत होते, त्या वेळी त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पायगुणामुळे महायुतीचे सरकार आले, असा दावा केला आहे. ते म्हणाले, माझ्या दोन वर्षांच्या आमदारकीच्या कालावधीत झालेल्या विकास कामांची यादी वाचायची म्हटली तरी त्याला अर्धा तास जाईल.

महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात आपले महायुतीचे सरकार आले. या महायुतीच्या सरकारले शेतकरी, माता-भगिनी, गोरगरिब, अशा सर्वांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहे. महिला सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. त्या माध्यमातून महिलांना सक्षम बनविण्याचे काम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही समाधान आवताडे यांनी (Samadhan Autade) स्पष्ट केले.

Samadhan Autade
Manoj Jarange Patil : मनोजदादा, आणखी जातींबरोबर वैर घ्यायचे; ती भूमिका मराठाविरोधी नाही का? : बार्शीतील कार्यकर्त्याचा सवाल

ते म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांमुळे राजकारणाचे परिवर्तन झालं आहे. मी कोणावरही टीका टिपण्णी करणार नाही. माझा तो स्वभावही नाही. आपण केलेले काम आणि भविष्यात आपण काय करणार आहे, एवढंच आपण लोकांसमोर घेऊन जायचं आहे.

Samadhan Autade
Raosaheb Danve : दानवेंनी खोडला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दावा; ‘भाजपचे नुकसान अजितदादांमुळे नव्हे; तर...’

आपली विकासाची संकल्पना लोकांपुढे मांडायची. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांतील विकास निधीची बेरीज करत आणली आणि माझ्या दोन वर्षांच्या काळातील बेरीज केली तर ती बरोबर येईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आपण मतदारसंघासाठी आणला आहे, असा दावाही आमदार आवताडे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com