

Pawan RajeNimbalkar: पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणात मुंबईतल्या विशेष सीबीआय कोर्टानं आज (२० जून) अंतिम निकाल सुनावला. यामध्ये मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांच्यासह आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्देष मुक्त करण्यात आलं. तत्पूर्वी कोर्टानं या खटल्यासंदर्भातील महत्वाच्या गोष्टींची नोंद घेतली. एका लोकनेत्याची राजकीय वैमन्यासून अशा पद्धतीनं हत्या होणं आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी २० वर्षांचा कालावधी लागणं हे अत्यंत वेदनादायक असल्याचंही यावेळी कोर्टानं म्हटलं.
विशेष सीबीआय कोर्टानं सबळ पुराव्यांअभावी हा निकाल दिला आहे. यावेळी कोर्टानं तपासाच्या प्रक्रियेतील अनेक तृटी देखील समोर आणल्या. त्याचबरोबर माफीचा साक्षीदार आणि इतर सर्व आरोपींनी ज्या पद्धतीनं वेळोवेळी आपल्या साक्ष बदलल्या तसंच याचे पुरावे पोलसांना मांडता आले नाहीत. तसंच ज्या माफीच्या साक्षीदाराच्या आधारावर गेल्या २० वर्षापासून हा खटला सुरु होता. पण माफीचा साक्षीदार पारसमल जैन बाधला हा वारंवार खोटं बोलत होता त्यामुळं या खटल्याचा पायाच कमकुवत बनला होता, असंही कोर्टानं निकाल सुनावताना सांगितलं.
दरम्यान, पोलिसांनी तपासामध्ये सुरुवातीपासूनच साध्या साध्या चुका केल्याचं निरिक्षण कोर्टानं यावेळी नोंदवलं. पोलिसांनी आरोपींचे फोन जप्त केले नाहीत, त्यांचे सीडीआर तपासले गेले नाहीत. तसंच ज्या गाडीमध्ये पवन राजेनिंबाळकर यांची हत्या झाली ती गाडी जप्त करण्यात आली नाही. या सर्व प्राथमिक तपासातून अनेक गोष्टी समोर येऊ शकल्या असत्या पण तपास यंत्रणांच्या तृटींमुळं खटल्याच्या आरोपींमध्ये विसंगती निर्माण झाली असल्याचंही कोर्टानं यावेळी सांगितलं.
पवन राजेनिंबाळकर यांची ३ जून २००६ रोजी मुंबईवरून उस्मानाबादला आपल्या कारमधून निघाले होते. या प्रवासात नवी मुंबईतल्या कळंबोली इथं त्यांच्या कारवर राजकीय वादातून गोळ्या झाडण्यात आल्या. या अचानक झालेल्या गोळीबारात पवन राजेनिंबाळकर आणि चालक समद काझी या दोघांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, या हल्ल्यामध्ये माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील हे या खटल्यात प्रमुख आरोपी होते. त्यांच्यासह इतर ९ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्यात सप्टेंबर २००९ पासून पद्मसिंह पाटील जामिनावर तुरुंगाबार बाहेर आले होते. गेल्या २० वर्षात या प्रकरणाचा तपास तीन तपास यंत्रणांनी केला. यामध्ये सुरुवातीला कळंबोली पोलिसांनी याचा तपास केला. त्यानंतर नवी मुंबईच्या गुन्हे शाखेकडं हा तपास गेला पण यावर समाधानी नसल्यानं ओम राजेनिंबाळकर यांच्या मागणीनुसार, हा तपास सीबीआयकडं देण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.