Kailas Gorantyal News: निवडणुकीत हरलेले कैलास गोरंट्याल न्यायालयातही खोतकरांविरुद्ध हरले!

Petition Against Arjun Khotkar Dismissed:कैलास गोरंट्याल यांनी दाखल केलेली अर्जुन खोतकर यांच्याविरोधातील याचिका खंडपीठाने फेटाळली. त्यामुळे खोतकर यांची आमदारकी कायम राहणार आहे.
Arjun khotkar- Kailas Gorntyal Crisis News
Arjun khotkar- Kailas Gorntyal Crisis NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena-Congress News : काँग्रसेचे माजी आमदार तथा जालन्यातील भाजपाचे विद्यमान नेते कैलास गोरंट्याल हे 2024 च्या विधानसभेत शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्याविरोधात हरले होते. त्यांच्या निवडीला गोरंट्याल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. परंतु ही याचिका खंडपीठाने फेटाळली आहे. त्यामुळे निवडणुकीत हरलेले गोरंट्याल खोतकर यांच्याविरोधात कोर्टातही हरले अशी चर्चा सुरू झाली आहे.

कैलास गोरंट्याल यांची याचिका खंडपीठाने फेटाळ्यामुळे अर्जुन खोतकर यांची आमदारकी पुढेही कायम राहणार आहे. जालना विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक काळ खोतकर आणि गोरंट्याल हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिले आहे. दोघांनीही एकमेकांना पराभूत करण्याची किमया साधलेली आहे. पराभवानंतर कैलास गोरंट्याल यांनी आतापर्यंत खोतकर यांच्या विरोधात दोन ते तीन वेळा खंडपीठात त्यांच्या निवडीला आव्हान दिले होते.

Arjun khotkar- Kailas Gorntyal Crisis News
Vijay Thalapathy News: विजयनं आपल्या ड्रायव्हरच्या मुलाला दिलं आमदारकीचं तिकीट!! बाप-लेक भावूक; व्हिडिओ पाहा

परंतु दोन्ही वेळी गोरंट्याल यांच्याविरोधात कोर्टाचा निकाल गेला. आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. खोतकर-गोरंट्याल यांच्या राजकीय वैराची चर्चा संपूर्ण मराठवाड्यात होत असते. जालना विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या अर्जुन खोतकर यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी यांचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. किशोर संत यांनी फेटाळून लावली.

Arjun khotkar- Kailas Gorntyal Crisis News
PMC News: पुणे महापालिकेचा अजब कारभार! 12 वर्षांत एकाही महापौराचं वास्तव्य नाही, तरीही बंगल्यावर 46 लाखांचा खर्च

2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला होता. खोतकर यांच्या निवडीला कैलास गोरंट्याल यांनी आव्हान दिले होते. याचिकेत म्हणणे मांडण्यात आले होते, की खोतकर हे जालना बाजार समितीचे मुख्य प्रशासक हे लाभाचे पद धारण करीत असल्याने ते विधानसभा निवडणूक लढवण्यास अपात्र आहेत.

Arjun khotkar- Kailas Gorntyal Crisis News
फडणवीसांनी 'मेट्रोवुमन'वर सोपवली मुंबईची जबाबदारी! कोण ठरल्या पहिल्या महिला आयुक्त?

खोतकर यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेले शपथपत्र विहित नमुन्यात नव्हते तसेच निवडणूक आयोगाने नियमांचे उल्लंघन करून निवडणूक घेतली. ज्यामुळे खोतकर यांना फायदा झाला. या याचिकेत खोतकर यांनी दिवाणी प्रक्रिया संहिता आदेश 7 नियम 11 नुसार अर्ज करून गोरंट्याल यांनी उपस्थित केलेल्या एकाही मुद्द्यात तथ्य नाही त्यामुळे त्यांची याचिका प्राथमिक टप्प्यावरच रद्द करावी, अशी विनंती केली होती.

खोतकर यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील संजीव देशपांडे यांनी युक्तीवाद केला. एखाद्या व्यक्तीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील धारण केलेले पद हे त्या व्यक्तीस विधानसभा निवडणूक लढविण्यास अपात्र करत नाही. अशी अपात्रता केवळ राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसाठी असते. तसेच खोतकर यांच्या उमेदवारी अर्जासोबतचे शपथपत्र विहित नमुन्यात असून, त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे.

Arjun khotkar- Kailas Gorntyal Crisis News
संतोष देशमुखांच्या भावानं उचललं भावनिक पाऊल! धनंजय देशमुखांनी मानेवरच...तीन शब्दांचा अर्थ काय?

निवडणूक आयोगावर करण्यात आलेले आरोप निराधार असून त्यांच्या पुष्ट्यर्थ त्यांनी एकही पुरावा दिलेला नाही, असा युक्तीवाद देशपांडे यांनी केला. सुनावणीअंती खंडपीठाने आमदार अर्जुन खोतकर यांचा अर्ज मंजूर करून कैलास गोरंट्याल यांची याचिका फेटाळून लावली. खोतकर यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील संजीव देशपांडे यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. सुबोध शाह व ॲड प्रतीक भोसले यांनी सहकार्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com